काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडेने बॉयफ्रेंड विकी जैनशी लग्न केले. त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. त्याचवेळी अंकिताच्या पायाला दुखापत झाली होती. तिला चालण्यासाठी वॉकरची मदत घ्यावी लागत होती. आता अंकिताचा पाय फ्रॅक्चर असल्याचे दिसत आहे. अशातच अंकिताने सोशल मीडियावर डान्स करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमुळे तिला ट्रोल केले जात आहे.

अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पती विकी जैनसोबतचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये अंकिताने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला असून ती पायाला दुखापत झाली असतानाही डान्स करत आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने ‘आमच्या डान्सप्रमाणे तुमचे नवीन वर्ष देखील धमाकेदार असू देत’ या आशयाचे कॅप्शन दिले होते.
Video:वहिनीसाहेब, विलासराव देशमुखांच्या सूनबाई आहात…; सलमानसोबतच्या त्या व्हिडीओमुळे जिनिलिया ट्रोल

सध्या अंकिताचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. एका यूजरने ‘अरे हिचा पाय तर फ्रॅक्चर झाला होता ना’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘आता पाय दुखत नाही वाटतं’ असे म्हणत अंकिताला ट्रोल केले आहे.

अंकिताच्या या व्हिडीओवर मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने देखील कमेंट केली आहे. ‘हाहाहाहा अगं थांब ना.. तो पाय तरी निट होऊ दे’ अशी कमेंट अमृताने केली आहे.