नवीन वर्षाची सुरुवात यंदा एकदम दणक्यात होणार आहे. कारण नव्या वर्षात अनेक नवे चित्रपट आणि मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या यादीमधील एक चित्रपट म्हणजे ‘लोच्या झाला रे.’ या चित्रपटाच अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, वैदेही परशुरामी आणि सयाजी शिंदे अशी तगडी स्टारकास्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘लोच्या झाला रे’ हा एक धमाकेदार विनोदी कौटुंबिक चित्रपट असणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुरेश जयराम यांच्या नाटकावर आधारित ‘लोच्या झाला रे’ या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. हे पोस्टर पाहून हा एक तुफान विनोदी चित्रपट असेल असे दिसतेय. आता कोणामुळे कोणाच्या आयुष्यात लोच्या झाला आहे, हे मात्र चित्रपट पाहिल्यावरच कळेल. मुळात हे चारही कलाकार एकत्र पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणार हे मात्र नक्की!
आणखी वाचा : रेखाने शेवटच्या श्वासापर्यंत विनोद मेहराची साथ सोडली नाही, पत्नीने केला मोठा खुलासा

‘लोच्या झाला रे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन परितोष पेंटर आणि रवी अधिकारी यांनी केले आहे. परितोष पेंटर यांनी यापूर्वी धमाल, टोचल धमाल अशा बॅालिवूडच्या चित्रपटांचे लेखन केले आहे. ‘लोच्या झाला रे’चे छायाचित्रण संजय मेमाणे यांचे असून ज्यांनी आधी झिम्मा, हिरकणी, हाफ तिकीट सारख्या सुपरहिट चित्रपटांच्या छायाचित्रणाची धुरा सांभाळली होती. या चित्रपटाचे चित्रीकरण लंडनमध्ये करण्यात आले आहे. यात विजय पाटकर, प्रसाद खांडेकर आणि रेशम टीपणीस यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ankush chaudhari upcoming movie locha jhala re avb