प्रत्येक सिनेमातून आपले वेगळेपण जपणारा मराठीचा ‘स्टाईल आयकॉन’ अंकुश चौधरी लवकरच एका नव्या रूपात प्रेक्षकांसमोर येत आहे. आतापर्यंत त्याने केलेल्या सिनेमातील विविध व्यक्तिरेखांमध्ये फिट आणि फाईन बसलेला अंकुश त्याच्या आगामी ‘देवा’ या सिनेमातून झळकणार आहे. या सिनेमात तो एका अतरंगी लूकमध्ये दिसेल.
या चित्रपटातील त्याचा लुक नुकताच सोशल मीडियावर वायरल झाला आहे. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन करण्याचा अट्टहास बाळगणाऱ्या अंकुशच्या या न्यू लुकला नेटीजन्सकडून चांगला प्रतिसाददेखील मिळत आहे. रंगीत सदरा, फेन्सी लॉकेट, हातात माळ, इयर रिंग्स आणि केसांची नवी स्टाईल यामुळे या सिनेमातली त्याची भूमिका नेमकी कशी असणार याबद्दल त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. अर्थात अंकुशचा हा अतरंगी लुक त्याच्या चाहत्यांना भुरळ पाडणाराच आहे यात काही शंका नाही.
इनोव्हेटिव्ह फिल्म्स आणि प्रमोद फिल्म्स यांची संयुक्त निर्मिती असलेल्या या सिनेमाचे सध्या कोकणात चित्रीकरण सुरु आहे. साऊथचे सुप्रसिध्द दिग्दर्शक मुरली नलप्पा यांच्या दिग्दर्शकीय नजरेतून आकारास येत असलेला ‘देवा’ अंकुशच्या स्टाईल आयकॉनला चारचाँद लावणारा ठरेल यात शंका नाही.
काही दिवसांपूर्वी अंकुश चौधरीची ‘हॅशटॅग’ नावाच्या मेन्स फॅशन ब्रँडने ‘ब्रँड अॅम्बेसिडर’ म्हणून निवड झाली होती. अंकुशची तरुणांमध्ये असलेली लोकप्रियता, तरुणांमध्ये असलेली त्याची क्रेझ आणि ब्रँडला मॅच होणारे व्यक्तिमत्व यामुळे फॅशन ब्रँडला प्रमोट करण्यासाठी अंकुशची निवड करण्यात आली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा