ए.आर. रेहमान हे नाव प्रत्येक भारतीयाला परिचित आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून त्याने आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली होती. आता त्याची ख्याती जगभरात पोहोचली आहे. ऑस्करसारख्या पुरस्कारावर भारताचं नाव कोरणाऱ्या रेहमानचे साऱ्या जगभरात चाहते आहेत. रिमेक आणि रीमिक्सच्या या ट्रेंडमध्ये रेहमान अजूनही त्याचं अस्तित्व टिकवून आहे. भारतीय संगीतक्षेत्रात रहमानचं योगदान अमूल्य आहे. आणि आज त्याच्या याच कामामुळे त्याला परदेशात एक वेगळाच सन्मान देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकतंच रेहमानने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून कॅनडामधील एका शहरातील रस्त्याला त्याचं नाव दिल्याची बातमी जाहीर केली आहे. सिटी ऑफ मारखमच्या महापौरांनी रेहमानला हा सन्मान दिला असून नुकताच यासाठी एक सोहळा कॅनडा येथे आयोजित करण्यात आला होता. याच सोहळ्याचे काही फोटोज त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत ही बातमी दिली आहे.

आणखी वाचा : ए आर रेहमान एका तासाला कमावतात ‘इतके’ कोटी, मानधनाचा आकडा ऐकून व्हाल थक्क

याआधी सुद्धा २०१३ मध्ये कॅनडाच्या एका रस्त्याला रेहमानचं नाव देण्यात आलं होतं. आता पुन्हा २०२२ मध्ये एका वेगळ्या रस्त्याला पुन्हा रेहमानचं नाव दिलं आहे. प्रत्येक भारतीयासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. रेहमानने याबद्दल तिथल्या अधिकाऱ्यांचे आणि इतर लोकांचे आभार त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये मानले आहेत. शिवाय हा सन्मान देऊन माझ्यावरची जवाबदारी आणखीन वाढली असल्याचंही रहमानने नमूद केलं आहे.

आणखी वाचा : A R Rahman Birthday: जन्माने हिंदू असलेल्या एआर रेहमान यांनी का स्वीकारला होता इस्लाम धर्म? जाणून घ्या

रेहमानने आजवर कित्येक चित्रपटांना संगीत दिलं आहे. त्यापैकी ‘रोजा’, ‘बॉम्बे’, ‘दिल से’ पासून अलीकडे आलेल्या ‘रंग दे बसंती’, ‘रॉकस्टार’, ‘हायवे’ अशा चित्रपटांचा समावेश आहे. ‘स्लमडॉग मिलेनियर’ या चित्रपटासाठी रेहमानच्या ‘जय हो’ या गाण्याला ऑस्कर पुरस्कारदेखील मिळाला आहे. या गाण्याचे शब्द गुलजार यांनी लिहिले आहेत आणि सुखविंदर सिंग यांनी ते गाणं गायलं आहे. मणीरत्नम यांच्या आगामी ‘PS 1’ या चित्रपटाच्या संगीताची धुरा रेहमान यांच्या खांद्यावर आहे.