बॉलिवूडमध्ये सध्या ब्रेक-अप आणि घटस्फोटाचे वारे वाहत असल्याचे चित्र दिसत आहे. रणबीर-कतरिना, फरहान अख्तर-अधुना यांनी वेगळे होण्याच्या बातम्या ताज्या असतानाच आता बॉलिवूडमधील आणखी एक सेलिब्रिटी जोडी विभक्त होण्याची शक्यता आहे. बॉलीवूड अभिनेता अरबाज खान- मलायका अरोरा हे विभक्त होणार असल्याचे वृत्त आहे. या दोघांमध्ये सध्या बरेच ताणतणाव असून ते विभक्त होणार असल्याते वृत्त स्पॉटबॉय डॉट कॉमने दिले आहे.
१७ वर्षाच्या एकत्र सहवासानंतर ते पहिल्यांदाच वेगळे रहात आहेत. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार मलायकाने अरबाजच्या वांद्र्यातील घराला राम राम ठोकला असून तिने आपल्या खारमधील घरात राहायला सुरुवात केली आहे. अरबाज आणि मलायका हे दोघेही ‘पॉवर कपल’ हा रिअॅलिटी शो होस्ट करत होते, मात्र ब-याच दिवसांपासून मलायका या शोमध्ये दिसलेली नाही. तसेच अरबाजची बहीण अर्पिता हिच्या दुबईतील ‘बेबी शॉवर’साठीही ती उपस्थित नव्हती.
याविषयी अरबाज आणि मलायका यांनी काहीच वक्तव्य केलेले नाही. मात्र, दोघांच्यात काहीच झालेले नसल्याचे मलायकाच्या मॅनेजरने सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा