केरळमधील कोच्ची येथे झालेल्या एका भीषण अपघातामध्ये दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ही सोमवारी पहाटेच्या सुमारास घडलाय. समोर आलेल्या माहितीनुसार या अपघातामध्ये मिस केरळ २०१९ स्पर्धा जिंकणारी २५ वर्षीय अनसी काबीर आणि याच स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक पटकावणारी डॉ.अंजना शाहजान या दोघांचे निधन झाले आहे. मात्र, अपघातापूर्वी अनसी काबीरने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. ती पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
अनसीने ही पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली होती. या पोस्टमध्ये अनसी रानात असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओत बॅकग्राऊंडला अॅस्ट्रॉनॉमी हे गाणं सुरु आहे. हा व्हिडीओ शेअर करत “आता जायची वेळ आली आहे…”, असं कॅप्शन देत अनसीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. अनसीचे निधन झाल्यानंतर आता तिची ही शेवटची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
आणखी वाचा : ऐश्वर्याच्या ४८ व्या वाढदिवसाच्या बर्थडेपार्टीतील फोटो व्हायरल
दरम्यान, अनसी काबीर आणि डॉ.अंजना शाहजान या गाडी चालवत असताना, त्यांच्या समोर आलेल्या एका दुचाकीला चुकवण्याच्या नादात त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. अपघाताच्या वेळी गाडीमध्ये त्यांच्यासोबत इतर दोन जणंही प्रवास करत होते. या दोघांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी मध्यरात्रीनंतर तिरुवनंतपुरम मधील एका रस्त्यावर हा अपघात घडला. अचानक समोर आलेल्या दुचाकीला होणारी धडक टाळण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला. यामध्ये गाडीतील दोघी जागीच ठार झाल्या तर इतर दोघे गंभीर जखमी झालेत.