बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ या चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच अंतिमचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर लॉन्चवेळी सलमानचे संपूर्ण कुटुंब आणि अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी हजेरी लावली होती. यावेळी महेश यांना स्लिम आणि फिट पाहून सगळ्यांना आश्चर्य झाले. यावेळी महेश यांनी त्यांची कर्करोगाशी झुंज आणि वेट लॉसची कहानी सांगितली.

महेश म्हणाले, काही महिन्यांपूर्वी त्यांना मूत्राशयाच्या कर्करोगाची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांची केमोथेरपी करण्यात आली होती. त्यावेळी त्यांचे जवळपास ३५ किलो वजन कमी झाले. महेश म्हणाले, जेव्हा चित्रपटाच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण सुरु होते. तेव्हा त्यांना कर्करोग असल्याचे कळले. मात्र, दोन महिन्याच्या केमोथेपरी नंतर आज त्यांच्या कर्करोगाचे निदान झाले आहे.

आणखी वाचा : Sacred Games: नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत इंटिमेट सीन शूट केल्यानंतर रडू कोसळलं, कुब्रा सैतने केला खुलासा

२ महिन्याच्या केमोथेरपी विषयी बोलताना महेश म्हणाले, चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान केमोथेरपी सुरु होती. त्यानंतर माझ्यावर शस्त्रक्रिया झाली. जेव्हा मला कळलं की मला कर्करोग आहे. तेव्हा मला कोणताही धक्का बसला नव्हता. कारण मला माहित आहे की असे बरेच लोक आहेत. ज्यांना कर्करोग झाला. त्यांनी त्याला लढा दिला आहे त्यांनी कर्करोगावर विजय मिळवला.

आणखी वाचा : आयुषमान खुराना चुकून प्यायला होता बाळासाठी काढलेले ब्रेस्ट मिल्क, पत्नी ताहिराने सांगितला ‘तो’ किस्सा

महेश पुढे म्हणाले की सलमान आणि आयुषने त्यांना कर्करोगाच्या त्यांच्या या लढ्यात त्यांना साथ दिली. ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ या चित्रपटातून छोट्या पडद्यावरील अभिनेत्री महिमा मकवाना मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. हा चित्रपट २६ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. यात सलमान एका पोलिसाच्या भूमिकेत आहे. तर आयुष एका खलनायकाच्या भूमिकेत आहे.

Story img Loader