संगीतकार- गायक अनू मलिक यांना ‘इंडियन आयडॉल १०’च्या परीक्षकपदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्यावर झालेल्या लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. पार्श्वगायिका सोना मोहपात्रा, श्वेता पंडित यांसोबतच आणखी दोन महिलांनी अनू मलिक यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे धक्कादायक आरोप केले आहेत.

अनू मलिक यांच्या जागी संगीत विश्वातील दिग्गज कलाकारांना परीक्षक म्हणून आमंत्रित करण्यात येईल. शोच्या एपिसोडनुसार हे परीक्षक बदलले जातील. विशाल ददलानी आणि नेहा कक्कर सध्या या रिअॅलिटी शोचे परीक्षत आहेत.

वाचा : अजय देवगण- प्रकाश झा पुन्हा एकत्र 

अनू मलिक यांच्यावर जेव्हापासून आरोप होऊ लागले तेव्हापासून सोनी टेलिव्हिजनच्या टीममध्ये त्यांच्या कराराविषयी चर्चा सुरू झाली होती. अखेर त्यांना पुढील चौकशी होईपर्यंत त्यांना परीक्षकपदावरून हटवण्याचा निर्णय सोनी टीव्हीने घेतला आहे. त्याचप्रमाणे अनू मलिक यांच्या पुढील भागांचे शूटिंगदेखील थांबवण्यात आले आहे.

प्रसिद्ध पार्श्वगायिका सोना मोहपात्रा आणि श्वेता पंडित यांच्यानंतर आता आणखी दोन महिलांनी संगीतकार- गायक अनू मलिक यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. १९९०मध्ये मेहबूब स्टुडिओमध्ये अनू मलिक यांना भेटायला गेले असता त्यांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. याआधीही मोठ्या गायकांसोबत गाण्याची संधी देण्यासाठी किस मागितल्याचा आरोप श्वेता पंडितने केला होता. दरम्यान अनू मलिकने सोना मोहपात्रा आणि श्वेता पंडितचे आरोप फेटाळून लावले आहेत.

Story img Loader