बॉलिवूडचे अभिनेते अनुपम खेर हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. अनुपम हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकताच अनुपम यांनी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

अनुपम यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अनुपम एका बाथटबमध्ये असल्याचे दिसत आहे. अनुपम हे बाथटबमध्ये असे झोपले आहेत जसं एक लहान बाळ आईच्या गर्भात असतं. हा बाथटब लाकडाचा आहे. हा फोटो शेअर करत “मला हा फोटो प्रचंड आवडला, मला आशा आहे की तुम्हाला ही आवडेल. त्यामुळे या फोटोसाठी कॅप्शन तुम्ही सुचवा. यात ज्या ५ लोकांचं कॅप्शन आवडेल त्यांना मी घरी बोलवणार, असे वचन देतो”, असे कॅप्शन त्यांनी दिले आहे.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
FIITJEE Chairman DK Goel abused employee during an online meeting video viral on social media
“कोर्टात जा आणि तक्रार कर…”, नामांकित कोचिंग इन्स्टिट्यूटच्या चेअरमनने केली शिवीगाळ, मीटिंगमध्ये कर्मचाऱ्याला ओरडला अन्…, पाहा VIDEO
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!
swapnil rajshekhar tula shikvin changalach dhada
“केरळ फिरतोय, पैसे फुकट गेले…”, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्याची उपरोधिक पोस्ट; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
Devendra Fadnavis says We Eknath Shinde Ajit Pawar Shares Funny Memes
“शपथविधीअगोदर खूप मीम्स आले, आम्ही तिघे…”, फडणवीसांनी सांगितलं ट्रोलर्सचं आवडतं मीम; अजित पवारांचा उल्लेख करत म्हणाले…
Comedian Sunil Pal reveals kidnapping ordeal
“डोळ्यावर पट्टी बांधून एका घरात नेलं अन्…”, कॉमेडियन सुनील पालने सांगितला अपहरणाचा घटनाक्रम; म्हणाला, “२० लाख रुपये…”

आणखी वाचा : “गळ्यात कच्चा बादाम अडकलाय का?” रानू मंडल यांचं गाणं ऐकून नेटकऱ्यांनी लावला कपाळाला हात

आणखी वाचा: ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मध्ये जेसिकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे तरी कोण?

यावर अनेक नेटकऱ्यांनी कॅप्शन सुचवायला सुरुवात केली आहे. एक नेटकरी म्हणाला, “असं वाटतंय की बाळ आईच्या गर्भात आहे.” दुसरा नेटकरी म्हणाला, “दिल तो बच्चा है जी.” तिसरा नेटकरी म्हणाला, “वॉट एन आइडिया सर जी”, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी अनुपम यांनी कॅप्शन सुचवण्यास मदत केली आहे. अनुपम यांचा हा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

Story img Loader