यावर्षाच्या सुरुवातीला ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. विवेक अग्निहोत्री यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात चित्रपटात ३२ वर्षांपूर्वी काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय आणि त्यांचा नरसंहार दाखवण्यात आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. हा चित्रपट इतका चालला की या चित्रपटाने ३०० कोटी रुपयांची कमाई केली. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारविरोधात पुन्हा एकदा आवाज उठवण्यात आला.
आणखी वाचा : अभिनेता किच्चा सुदीपच्या अभिनय कारकीर्दीला २५ वर्षे पूर्ण, भारतीय टपाल विभाग करणार ‘विशेष’ सन्मान
१९९० साली झालेल्या काश्मिरी पंडितांच्या नरसंहारासाठी ‘एसआयटी’द्वारे चौकशी करण्यासाठी एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्याचा आज दुपारी निकल लागला. कोर्टाने ही याचिका फेटाळली असल्याचं समोर आलं आहे. यावर अभिनेते अनुपम खेर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ही याचिका फेटाळाल्याबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. अनुपम खेर यांनी ट्वीट करत लिहिले, “निराश आणि दुःखी!”
सुप्रीम कोर्ट यावेळी काश्मिरी पंडितांना न्याय मिळवून देईल अशी अनुपम खेर यांना आशा होती. कोर्टाचा निकाल लागण्याच्या काही तसांपूर्वी त्यांनी तसे ट्वीटही केले होते. त्या ट्वीटमध्ये त्यांनी “माननीय सर्वोच्च न्यायालय! काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराला ३२ वर्षांहून अधिक काळानंतर, भारतातील सर्वात शांतताप्रिय समुदायांपैकी एकावर झालेल्या अत्याचाराच्या एसआयटी चौकशीसाठीच्या याचिकेवर तुमची सुनावणी होईल. तुमचा आजचा निर्णय न्यायासाठी आवश्यक उपचार प्रक्रिया सुरू करू शकतो,” असे म्हटले होते.
परंतु सुप्रीम कोर्टाने निकाल जाहीर केला आणि ‘एसआयटी’द्वारे चौकशी करण्यासाठी दाखल केलेली जनहित याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली. या निर्णयावर अनुपम खेर निराश झाले आणि प्रतिक्रिया देताना अनुपम खेर यांनी दुःख व्यक्त केले.
हेही वाचा : ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाच्या प्रमोशनमागे ‘भाजपा’? विवेक अग्निहोत्रींनी केला खुलासा
‘वी द सिटीजन’ या खासगी संस्थेने ही जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेत १९९३ ते २००३ या दरम्यान कश्मीरमध्ये झालेल्या काश्मिरी हिंदू तसेच शीख लोकांच्या हत्येची चौकशी व्हावी असं नमूद करण्यात आलं होतं. तसेच अलीकडच्या काही महिन्यांत काश्मीर खोऱ्यात मारल्या गेलेल्या काश्मिरी पंडितांच्या हत्येची चौकशी करण्याची मागणीही या याचिकेत करण्यात आली होती.