देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या घटनांचा विरोध करत साहित्यिकांपाठोपाठ चित्रपट दिग्दर्शकांनीही पुरस्कार परत करण्यास सुरूवात केली असताना त्यावर ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी सडकून टीका केली आहे. पुरस्कार परत करणाऱयांचा उल्लेख अनुपम खेर यांनी ‘पुरस्कारवापसी गँग’ असा केला आहे. या पुरस्कारवापसी गँगने केवळ सरकारचाच नाही तर परिक्षक तसेच ज्या प्रेक्षकांनी यांच्या चित्रपटांना यशाच्या शिखरावर नेलं त्या सगळ्यांचाच अपमान केला आहे, अशी टीकात्मक ट्विट अनुपम खेर यांनी केले आहे. तर, चित्रपट निर्माते मधुर भंडारकर यांनीही अनुपम खेर यांच्या सुरात सूर मिसळून राष्ट्रीय पुरस्कार परत करणे म्हणजे त्या पुरस्काराचा अपमान करण्यासारखे आहे, असे म्हटले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशातील असहिष्णू वातावारणाचा निषेध म्हणून लेखक आणि कलाकारांकडून सुरू असणाऱ्या ‘पुरस्कार वापसी’ आंदोलनात आता शास्त्रज्ञही सहभागी झाले आहेत. देशातील बुद्धिप्रामाण्यावाद, तर्क आणि विज्ञानाच्या सरकारी गळचेपीचा निषेध म्हणून ज्येष्ठ शास्त्रज्ञ पी.एम. भार्गव यांनी त्यांना मिळालेला पद्मभूषण पुरस्कार सरकारला परत करण्याची घोषणा केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा