भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू ऋषभ पंतच्या कारला ३० डिसेंबरला (शुक्रवारी) भीषण अपघात झाला. ऋषभच्या अपघातानंतर त्याची स्थिती पाहून सगळ्यांनाच दुःखद धक्का बसला. अपघातानंतर तो कारमधून बाहेर पडताच त्याचा कारला आग लागली. लगेचच ऋषभला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. दरम्यान देहरादूनच्या मॅक्स रुग्णालयामध्ये जाऊन अनिल कपूर व अनुपम खेर यांनी त्याची भेट घेतली.

ऋषभच्या अपघातानंतर क्रिकेटप्रेमी त्याच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. तर सोशल मीडियाद्वारे त्याचे चाहते तू लवकर बरा हो असं सतत म्हणत आहेत. दरम्यान अनिल व अनुपम यांनी ऋषभची भेट घेतल्यानंतर तो ठिक असल्याचं त्यांनी ‘एएनआय’ला सांगितलं. शिवाय दोघांनी ऋषभच्या कुटुंबियांचीही भेट घेतली.

nala sopara railway station
मराठीचा आग्रह करणाऱ्या प्रवाशाला डांबले, तिकीट तपासनीसाची दमदाटी
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
raj Thackeray Asilata Raje
Raj Thackeray : स्वातंत्र्यवीर सावरकरांची नात आहे राज ठाकरेंची बालमैत्रीण, म्हणाले, “आम्ही शिशूवर्गापासून…”
Akshay Kumar And Shreyas Talpade
“पहिल्या दिवसापासून त्याने मला…”, श्रेयस तळपदेने सांगितला अक्षय कुमारबरोबर काम करण्याचा किस्सा; म्हणाला…
ajit ranade resigned
गोखले संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडे यांचा राजीनामा
loksatta readers feedback
लोकमानस: अर्थकारणाच्या विकेंद्रीकरणातून ‘संघराज्य’
nawab malik son in law sameer khan passed away
नवाब मलिक यांच्या जावयाचे निधन; काही दिवसांपूर्वी झाला होता गंभीर अपघात, निवडणूक काळात कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
all party leaders meet mahesh patil in hospital after bitten by snake
साप चावलेल्या कल्याण ग्रामीण तालुकाप्रमुख महेश पाटील यांची सर्व पक्षीय नेत्यांकडून विचारपूस

यावेळी अनुपम खेर यांनी सगळ्यांनाच एक मोलाचा सल्ला दिला. अनुपम म्हणाले, “कृपया गाडी सावकाश चालवा. कारण देहरादून भागामध्ये रात्री धुकं अधिक असतं. त्यामुळे काळजीपूर्वक गाडी चालवा.” अनुपम यांनी यावेळी सगळ्यांना नविन वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या.

आणखी वाचा – ऋषभ पंतला भेटायला गेले अनिल कपूर व अनुपम खेर; नेटकऱ्यांना फोटोमध्ये दिसलं भलतंच.. पाहा मीम्स

अनिल व अनुपम यांच्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ऋषभ पंतच्या घरी फोन करत त्याच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडूही त्याच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत.