माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या राजकीय कारकीर्दीवर आधारित  ‘द अॅक्सिडेंटल प्राइममिनिस्टर’ हा चित्रपट पुढील वर्षांत प्रदर्शित होत आहे. मात्र ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतरच या चित्रपटावर मोठे वाद निर्माण व्हायला सुरूवात झाली आहे. युथ काँग्रेसनं या चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेतला आहे. या चित्रपटात अनुपम खेर मनमोहन सिंग यांच्या भूमिकेत आहेत. मात्र सुरूवातीला या चित्रपटात काम न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता, यामागचं कारण नुकतंच त्यांनी ट्रेलर लाँच सोहळ्याच्यावेळी सांगितलं.

‘साधरण दीड एक वर्षांपूर्वी माझ्या एका मित्रांनं मला डॉ. मनमोहन सिंग यांच्या आयुष्यावर चित्रपट येणार असल्याचं सांगितलं होतं. त्यांच्यावर आधारलेली कांदबरी आधीच वादात सापाडली होती. मला त्या वादाची कल्पना होती. तसेच असंख्य कारणांमुळे मला या चित्रपटात काम करायचं नव्हतं. या चित्रपटात कामच करायचं नाही ही माझी त्यावेळी पहिली प्रतिक्रिया होती’ असं अनुपम खेर प्रतिक्रिया देताना म्हणाले. ‘हा संपूर्ण राजकिय चित्रपट असेल आणि त्यात काय दाखवतील याची मला कल्पना नव्हती. त्यातून डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या मोठ्या नेत्याची भूमिका साकारणं ही सोप्पी गोष्ट नव्हती म्हणूनच मी सुरूवातीला हा चित्रपट न करण्याचं ठरवलं होतं’ असंही अनुपम खेर म्हणाले.

मात्र त्यांचा नकार हा लवकरच होकारात परिवर्तीत झाला आणि याला कारणं ठरलं ही भूमिका साकारण्यात असलेलं आव्हान होय. मी मनमोहन सिंग यांना टीव्हीवर पाहिलं ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर गेले. मी अगदी तसंच चालण्याचा प्रयत्न केला. जवळपास ४५ मिनिटं हुबेहुब चालण्याचा सराव करूनही माझ्या पदरात अपयश आलं अखेर ही भूमिका साकारण्यात खरं आव्हान असल्याचं मला लक्षात आलं मी लगेच चित्रपटाच्या दिग्दर्शकाकडून स्क्रिप्ट मागवली मला ती खूपच आवडली आणि मी चित्रपटाला होकार दिला, असा अनुभवही त्यांनी सांगितला.

मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार असणाऱ्या संजय बारू लिखित ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर- मेकिंग अँड अमेकिंग ऑफ मनमोहन सिंग’ या पुस्तकावर आधारित हा चित्रपट ११ जानेवारीला प्रदर्शित होत आहे.

Story img Loader