बहुतेक कलाकार अभिनयाला आपले करियर म्हणून निवडण्यापूर्वी अजून इतर काही पर्याय आहेत का? याचा विचार करतो. काहींना वाटते आपण गायक बनाव, काहींना इंजिनियर तर काहींना डॉक्टर बनायचे असते. पण त्यांच्या नशिबात जर कलाकार बननंच  लिहल असेल तर कोणी काय करू शकतं. बॉलीवूड अभिनेता अनुपम खेर यांच्यासोबतही असेच काही झाले. मात्र, त्यांनी अभिनयाची निवड करण्यापूर्वी कोणताही छोट्या पर्यायाची निवड केली नव्हती तर त्यांना थेट देशाचे पंतप्रधानचं बनण्याची इच्छा होती. इतकचं नाही तर ते त्यांच्या मित्रांनाही मी एक दिवस पंतप्रधान बनणार असे सांगायचे.
६ जुलैपासून अनुपम खेर यांचा ‘कुछ भी हो सकता है’ हा रिअँलिटी शो कलर्स वाहिनीवर सुरु होत आहे. या शोमध्ये ते बॉलीवूड सेलिब्रेटींसोबत चर्चा करताना दिसतील. शाहरुख खान, महेश भट्ट, आलिया भट्ट, रणवीर सिंह, अर्जुन कपूर, विद्या बालन हे या शोमध्ये गप्पा मारताना दिसतील. हे सर्व आहेत तर सुपरस्टार पण त्यांनी तिथपर्यंत पोहचण्यासाठी काय काय केलं ते कोणालाचं माहित नाही. कुछ भी हो सकता है पत्रकार परिषदेदरम्यान अनुपम यांना विचारण्यात आले की, तुम्ही नेहमीच राजकीय पक्षांबद्दल बोलता पण स्वतः कधी राजकारणात जाण्याचा विचार नाही केलात? त्यावर अनुपम म्हणाले, १०-१२ वर्षांपूर्वी मला प्रधानमंत्री बनण्याची इच्छा होती. आपल्या समाजाला, कायदा व्यवस्थेला जेव्हा बदलण्याची गरज आहे हे मी पाहायचो तेव्हा आपण प्रधानमंत्री बनून या गोष्टींना बदलण्याची गरज आहे असे मला वाटायचे. मी माझ्या मित्रांना बोलायचो एक दिवस मी पंतप्रधान होणार. पण, आता मला कळलय की मला अभिनेताचं व्हायचय आणि मी अभिनेता म्हणूनच राहणार. बघायला गेलं तर अनुपम यांनी खूप मोठ स्वप्न पाहिलं होत. ते पंतप्रधान नाही बनू शकले पण ते भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान कलाकारांपैकी एक आहेत. आपण पुढील पाच ते दहा वर्षांमध्ये निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Story img Loader