अभिनेता आर माधवनचा ‘द रॉकेट्री’ हा सिनेमा काही दिवसांपूर्वींच रिलीज झालाय. या सिनेमाचं सर्वत्रच कौतुक होतंय. चाहत्यांपासून, समिक्षक आणि अनेक बड्या सेलिब्रिटींनीदेखील त्याच्या सिनेमाचं कौतुक केलंय. आर माधवनने दिग्दर्शित केलेला हा त्याचा पहिला सिनेमा आहे. शिवाय या सिनेमात त्याने मुख्य भूमिका साकारली आहे. अभिनेते अनुपम खेर यांनी देखील नुकताच ‘रॉकेट्री’ सिनेमा पाहिला. हा सिनेमा पाहिल्यानंतर अनुपम खेर यांनी एक व्हिडीओ शेअर करत माधवनच कौतुक केलंय.
अनुपम खेर यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. हा सिनेमा पाहून अश्रू अनावर झाल्याचं ते म्हणाले. माधवनचा अभिनय पाहून खूप गर्व वाटल्याचं ते म्हणाले. तसचं आतापर्यंतचा त्यांनी पाहिलेला हा सर्वोत्कृष्ट सिनेमा असल्याचं ते म्हणाले.
हे देखील वाचा: हृता दुर्गुळेच्या ‘अनन्या’ चित्रपटाचे प्राजक्ता माळीला विशेष कौतुक, म्हणाली “हा अतिशय…”
या व्हिडीओत अनुपम खेर यांनी सिनेमातील डायलॉग्स आणि कास्टचं देखील कौतुक केलं. तर माधवनचं कौतुक करत ते म्हणाले, “तुझा परफॉर्मन्स वर्ल्ड क्लास आहे. तू खूपच जबरदस्त आहेस.” तसचं अनुपम खेर यांनी तरुणांना सिनेमा पाहण्याचं आवाहन केलं. ‘रॉकेट्री’ सिनेमा तरुणांना प्रेरणा देणारा आहे असं ते म्हणाले.
या सिनेमातून नंबी नारायणन यांचा जीवनप्रवास उलगण्यात आलाय. त्यांचा संघर्ष पाहून अनुपम खेर यांनी त्यांची माफी मागितली. व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिलं, “अभिनेता माधवनचा रॉकेट्री सिनेमा पाहिला. नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित सिनेमा खूपच उत्कृष्ट आहे. सिनेमा पाहून खूप वेदना झाल्या. प्रत्येक भारतीयने हा सिनेमा पाहिला हवा. नंबी नारायणन सर सॉरी. अशा प्रकारेच आम्ही काही भूतकाळातील चुका सुधारु शकतो. शानदार माधवन.”
हे देखील वाचा: आमिर खानची लेक आयरा अडकणार लग्नाच्या बेडीत? बॉयफ्रेंड नुपूर शिखरेनं घेतली आजीची भेट
रॉकेट्री सिनेमातून माधवनने दिग्दर्शनात पाऊल टाकलंय. दिग्दर्शक म्हणून त्यचा पहिलाच सिनेमा सुपरहिट ठरला आहे.