अभिनेते अनुपम खेर सध्या द काश्मीर फाईल्स या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. अनुपम खेर हे अभिनयाशिवाय त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी देखील ओळखले जातात. बऱ्यादचा ते भाजपाचं समर्थन करताना दिसतात, त्यामुळे त्यांना ट्रोल देखील केलं जातं. परंतु एकदा एका मुलाखतीत तुम्ही मोदीभक्त आहात का?, असा थेट प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी उत्तर देखील दिलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनुपम खेर यांना एका टीव्ही मुलाखतीदरम्यान लोक तुम्हाला मोदी भक्त म्हणतात, असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर अनुपम खेर यांनी एका गाण्याच्या माध्यमातून दिले होते. यासोबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.

Video: The Kashmir Files वरुन मोदींनी सुनावलं; म्हणाले, “ज्यांना वाटतं की हा चित्रपट योग्य नाही त्यांनी…”

टाइम्स नाऊ नवभारत या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, अँकरने अनुपम खेर यांना विचारले होते की, “तुम्ही मोदी भक्त, उजव्या विचारसरणीचे आहात आणि या सरकारची भाषा बोलता, असे आरोप तुमच्यावर होतात. सोशल मीडियावर असे आरोप करणाऱ्यांना तुम्ही काय सांगाल? यावर अनुपम खेर म्हणाले, आमच्या काळातील एक खूप प्रसिद्ध गाणे आहे…कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. छोड़ो बेकार की बातों को, कहीं बीत ना जाए रैना.”

“आज मुस्लिमांची संख्या…”, व्हिडीओ शेअर करत कंगनाने केली The Kashmir Files पाहण्याची विनंती

“मी शिवभक्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत अनुपम खेर म्हणाले होते की, त्यांची स्तुती करणे ही भक्ती असेल तर भक्त म्हणवून घेण्यास मला काहीच हरकत नाही. मी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांचाही मोठा चाहता आहे. तुम्ही मला त्यांचा भक्त देखील म्हणू शकता,” असं ते म्हणाले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anupam kher reaction when anchor asked him are you modi bhakt hrc