बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता अनुपम खेर ही लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. अनुपम यांचा आज ६७ वा वाढदिवस आहे. अनुपम यांनी आता पर्यंत अनेक भूमिका साकारल्या आहेत. पण अभिनय क्षेत्रात स्वत: ची ओळख निर्माण करण्यासाठी अनुपम यांनी एकदा चोरी केली होती. या विषयी त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.
अनुपम यांनी २०१८ मध्ये ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला होता. “मी एक चांगला खेळाडू होतो. पण उत्तम काम मी नाटक करताना करायचो. मी सरकारी महाविद्यालयमध्ये शिकत होतो, तेव्हा मला हिमाचल प्रदेश विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून घोषित करण्यात आले होते. मी कॉलेजमध्ये इंडियन थिएटर डिपार्टमेंट घेतलं होतं. पंजाब युनिव्हर्सीटीमध्ये मुलांना वॉक-इन ऑडिशनसाठी बोलावण्यात आले होते. त्यात जो जिंकेल त्याला २०० रुपये शिष्यवृत्ती देणार असल्याचे सांगितले. माझ्यात आई-वडिलांशी या विषयी बोलण्याची हिंमत नव्हती, म्हणून मी माझ्या आईने तिच्या मंदिरात ठेवलेले ११८ रुपये चोरले आणि पंजाब युनिव्हर्सीटीत गेलो.”
आणखी वाचा : जिनिलिया माहेरी जाणार ऐकताच, रितेश देशमुखने गायलं हे गाणं; Video पाहून हसू आवरणार नाही
ते पुढे म्हणाले, “मला आठवतं की त्यात दोन भूमिका होत्या. एक मुलींसाठी आणि दुसरी मुलांसाठी, मी मुलीची भूमिका साकारली. तर पॅनेलमध्ये असलेल्या बळवंत गार्गी यांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि ते म्हणाले, ‘खूप वाईट पण खूप धाडसी निर्णय’. संध्याकाळी घरी परतल्यावर मला कळले की माझ्या आई-वडिलांनी पोलिसांना बोलावले आहे. माझ्या आईने मला पैसे घेतले का असे विचारले पण मी स्पष्टपणे नकार दिला. एका आठवड्यानंतर माझ्या वडिलांनी मला फोन करून विचारले, ‘त्या दिवशी तू कुठे गेला होतास का?’ मी त्यांना संपूर्ण हकीकत सांगितली. त्यानंतर आईने मला एक कानशिलात लगावली. माझ्या वडिलांनी तिला सांगितले, ‘काळजी करू नकोस त्याला २०० रुपये शिष्यवृत्ती म्हणून मिळाले आहेत, तो तुझे १०० रुपये परत करेल, अशा प्रकारे मला माझ्या थिएटर डिपार्टमेंट मधल्या प्रवेशाबद्दल कळले.”