मधुर भांडारकरने आतापर्यंत अनेक मोठ्या बॉलिवूड कलाकारांसोबत काम केले आहे. आजही असे अनेक कलाकार आहेत ज्यांना मधुरसोबत काम करण्याची तीव्र इच्छा असते. पण यासंबंधीत एक गोष्ट वाचून तुम्हीही हैराण व्हाल. अभिनेते अनुपम यांना जेव्हा मधुर नवीन सिनेमाचे चित्रीकरण सुरू करणार असे कळले तेव्हा त्यांनी त्या सिनेमात एखादी व्यक्तिरेखा मिळवण्यासाठी चक्क डझनभर फोन केले. हे आम्ही नाही तर स्वतः अनुपम यांनी सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘इंदु सरकार’वर जरा जास्तच खुश सेन्सॉर बोर्ड अध्यक्ष

‘इंदु सरकार’ सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चवेळी अनुपम यांना हा किस्सा सांगितला. ते म्हणाले की, ‘मधुरने आतापर्यंत १२ सिनेमे बनवले आहेत आणि मी त्याला प्रत्येक सिनेमावेळी म्हणजे १२ वेळा एखाद्या व्यक्तिरेखेसाठी फोन केला आहे. प्रत्येक सिनेमाच्या चित्रीकरणावेळी मी त्यांना फोन करायचो आणि या सिनेमात घेणार की नाही असं विचारायचो. तुम्हाला खोटं वाटतं असेल तर तुम्ही मधुरलाही ही गोष्ट विचारू शकता.’

‘खास गोष्ट अशी आहे की, या सिनेमांबद्दल मला मधुरचे सहकारी अशोकच सांगायचे. प्रत्येक सिनेमावेळी ते लेखकांना बोलवायचे तेव्हा माझा फोन त्यांना जायचा. मला ज्या दिग्दर्शकासोबत काम करायचे आहे, त्याच्याकडे स्वतःहून जाऊन काम मागायला अजिबात लाज वाटत नाही.’ खेर पुढे म्हणाले की, ‘मधुरने या सिनेमासाठी संपूर्ण तयारी केली होती. आम्ही कलाकारांनी फक्त त्या व्यक्तिरेखा जीवंत करण्याचा आमच्यापरिने प्रयत्न केला.’

तब्बल १३ वर्षांनी लहान अभिनेत्याशी रोमान्स करतेय तब्बू

‘इंदु सरकार’ हा सिनेमा देशात झालेल्या आणीबाणीच्या वेळी घडलेल्या काही घटनांच्या आधारावर तयार करण्यात आला आहे. या सिनेमात अनुपम खेर यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. हा सिनेमा २८ जुलैला प्रदर्शित होणार आहे. मधुर भांडारकर दिग्दर्शित आगामी ‘इंदु सरकार’ सिनेमात नील नितिन मुकेश संजय गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून संजय गांधी यांच्या भूमिकेविषयी रंगलेल्या चर्चेवर दिग्दर्शक मौन बाळगून होते. या सिनेमात सुप्रिया विनोद इंदिरा गांधींची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. या दोन कलाकारांशिवाय सिनेमात किर्ती कुल्हारी आणि ‘अहिल्या’ फेम टोटा रॉय चौधरी हेदेखील दिसणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anupam kher said he call every time to madhur bhandarkar for role in new film indu sarkar