दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचा ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सातत्याने चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत २०० कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे. सध्या सर्वत्र या चित्रपटाचं कौतुक होताना दिसत आहे. हा चित्रपट १९९० मध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर आधारित आहे. आमिर खान, अक्षय कुमार, यामी गौतम, मनोज बाजपेयी यांसारख्या अनेक कलाकारांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. त्यानंतर आता बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता सलमान खाननेही या चित्रपटाबद्दल पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही तासांपूर्वी सलमान खानने ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पाहिला. हा चित्रपट पाहिल्यानंतर सलमानने थोडासाही वेळ वाया न घालवता अभिनेते अनुपम खेर यांना फोन केला. यावेळी सलमानने अनुपम खेर यांच्याशी बातचीत करताना या चित्रपटाचे मला फार कौतुक आहे. या चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दल तुमचे खास अभिनंदन, असे त्याने म्हटले.

Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”

‘नवभारत टाइम्स’शी बोलताना अनुपम खेर यांनी याबाबतचा खुलासा केला आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पाहिल्यानंतर कोणकोणत्या कलाकारांनी त्यांचे कौतुक केले असा प्रश्न विचारला होता. त्यावर ते म्हणाले, ‘बॉलिवूड अभिनेता सलमान खानने चित्रपट पाहिल्यानंतर फोन केला आणि त्याने माझे अभिनंदन केले.’

अनुपम खेर आणि सलमान खान यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘द कश्मीर फाइल्स’च्या यशावर बॉलिवूडने पूर्णपणे मौन बाळगल्याचा आरोप केला जात आहे. यावर अनुपम खेर म्हणाले, या चित्रपटाच्या यशाने सर्वांनाच धक्का बसला आहे. हिंदी सिनेसृष्टीही फार धक्क्यात आहेत, असे मला वाटतं. याबाबत विविध प्रतिक्रियाही उमटताना पाहायला मिळत आहे.

“हा चित्रपट…”, विवेक अग्निहोत्रींच्या ‘द कश्मीर फाईल्स’वरील वादावर नवाजुद्दीन सिद्दीकीची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं असलं तरी आज भारतात एक वर्ग असाही आहे. ज्यांनी या चित्रपटाला सातत्यानं विरोध केला आहे. काही लोकांच्या मते विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटात सत्याची तोडमोड करून कथा मांडली आहे. ज्यामुळे मुस्लीम लोकांचा तिरस्कार केला जात आहे. मात्र विवेक अग्निहोत्रींनी याबाबत सविस्तर प्रतिक्रिया देत म्हटलं की, त्यांनी या चित्रपटात केवळ सत्य घटना दाखवली आहे. मात्र आता त्यांना यावरुन काहीही कारण नसताना वादात ओढलं जात आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

Story img Loader