बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता अनुपम खेर यांची लोकप्रियता देशातच नाही तर जगभरात पसरली आहे. आजवर अनुपम खेर यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. मात्र नुकत्याच घडलेल्या एका घटनेमुळे अनुपम खेर यांच्यापुढे आता डबक्यात बुडून मरावं की काय असा प्रश्न पडला. अनुपम खेर सध्या आपल्या कुटुंबियांसोबत सिमला इथं निवांत वेळ घालवत आहेत. मात्र इथं अनुपम खेर यांची एका अशा व्यक्तीशी गाठ पडली ज्या व्यक्तीने दिग्गज अभिनेता असूनही अनुपम खेर यांना ओळखलं नाही. यानंतर अनुमप खेर स्वत: हैराण झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या मूळ गावी म्हणजेच सिमलामध्ये अनुपम खेर सकाळी मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. यावेळी एक मजेशीर घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ अनुपम खेर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. या व्हिडीओत अनुपम खेर आधी रस्त्यावरून जाणाऱ्या एक व्यक्तीची विचारपूस करतात. ते कुठे राहतात. किती दूर त्यांचं घर आहे. त्याचं नाव विचारतात. यावर ही व्यक्ती त्याचं नाव ज्ञानचंद असल्याचं सांगते. पुढे अनुपम खेर म्हणतात, “तुम्ही मला ओळखता का?” यावर ही व्यक्ती नाही असं उत्तर देते. त्यानंतर अनुपम खेर मास्क काढून पुन्हा त्यांना ओळखलं का? असा प्रश्न विचारतात. यावर “सर तुमचं नाव लक्षात नाही” असं उत्तर ज्ञानचंद यांनी दिल्यावर अनुपम खेर थक्क झाल्याचं पाहायला मिळतंय.

हे देखील वाचा: इंदिरा गांधी यांच्या भूमिकेसाठी कंगना रणौत सज्ज; ‘अशी’ सुरू आहे लूकसाठी तयारी

हा मजेशीर व्हिडीओ अनुपम खेर यांनी शेअर केलाय. “५१८ सिनेमांमध्ये काम करूनही मला यांनी ओळखलेलं नाही. डबक्यात बुडून मरण्याची वेळ आलीय.” असं अनुपम खेर त्यांच्या व्हिडीओत मजेशीर अंदाजात म्हणत आहेत. मात्र दुसरीकडे सिमला सारख्या छोट्याश्या शहरात राहण्याचा हाच आनंद असल्याचं ते म्हणाले आहेत.

हा व्हिडीओ शेअर करत अनुपन खेर यांनी एक पोस्ट लिहिली आहे. यात ते म्हणाले, ” रिअॅलिटी चेक. मी जगासमोर नेहमी मोठ्या गर्वाने मी ५१८ सिनेमांमध्ये काम केल्याचं सांगतो. मला वाटतं होतं प्रत्येकजण मला ओळखतो. मात्र ज्ञानचंदजींमुळे माझ्या आत्मविश्वासाला तडे गेले. त्यांना मी कोण आहे हे माहित नव्हतं. खरं तर हे मजेशीर आणि सुंदर होतं. मला पुन्हा एकदा जमिनीवर आणण्यासाठी धन्यवाद मित्रा” असं सुंदर कॅप्शन अनुपम खेर यांनी दिलंय.

अनुपम खेर सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. नेटकरी देखील अनुपम खेर यांच्या प्रत्येक पोस्टला कायम पसंती देताना दिसतात. अनुपम खेर अनेकदा त्यांच्या आईसोबतचे विनोदी व्हिडीओ शेअर करून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात.