बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी काही दिवसांपूर्वीच लहान मुलांचा एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये गावातील काही मुलांनी डब्बे आणि काठ्यांच्या मदतीने मिलिटरीचं संगीत वाजवत त्यावर कदमताल करताना दिसून येत आहेत. देशभक्तीपर हा व्हिडीओ पाहून भारत देशातील प्रतिभाशाली मुलांचं कौतुक करण्यासठी अभिनेते अनुपम खेर यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. पण हा व्हिडीओ भारतातला नव्हे तर पाकिस्तानमधला असल्याचं सांगण्यात येतंय.
बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ भारतातल्या एका गावातला असल्याचं लिहित त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आणि लहान मुलांच्या कलेचं कौतुक केलं. “भारतातल्या एका गावात काही मुलांनी मिळून स्वतःचा बँड तयार केला आहे. या बँडकडे कोणतीही आधुनिक उपकरणे नाहीत. परफॉर्मन्ससाठी त्यांनी कोणता सूर निवडला? मिलिटरी धून, कारण त्यांना माहित आहे की “खरी शक्ती हृदयात असते” !! या मुलांना सलाम! ही मुलं कुठे आहेत?” असं त्यांनी हा व्हिडीओ शेअर करत लिहिलं.
भारत के किसी गाँव में कुछ बच्चो ने मिलकर अपना एक बैंड तैयार किया है।इस बैंड के पास कोई आधुनिक साज़ो सामान नहीं है।और इन्होंने धुन भी क्या चुनी है! मिलिट्री बैंड की।क्योंकि ये जानते हैं कि “असली पावर दिल में होती है!!” इन बच्चों की जय हो।किधर हैं ये बच्चे? @Bengaluruhudugi pic.twitter.com/e6TjweFRwJ
— Anupam Kher (@AnupamPKher) August 18, 2021
अनुपम खेर यांच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ पाहून शहजाद रॉय नावाच्या सोशल मीडिया युजरने रिप्लाय करत लिहिलं, “सर, हा व्हिडीओ शेअर केल्याबद्दल धन्यवाद. मी काही दिवसांपूर्वी हा व्हिडीओ शेअर केला होता. तुम्ही लिहिले आहे की ही हुशार मुले भारतातील आहेत, म्हणून मी एक विनम्र सुधारणा करू इच्छितो की ही मुले पाकिस्तानच्या हुंजा इथली आहेत. मी त्याच्या संपर्कात आहे आणि त्या सर्वांना आवश्यक असलेली सर्व वाद्येही पाठवली आहेत.” या युजरच्या रिप्लायनंतर हा व्हिडीओ भारतातला आहे की पाकिस्तानमधला यावर चर्चा सुरू झाली.
Sir @AnupamPKher Thanks for sharing the video I shared a few days back. You say that these talented kids are from Bharat, a humble correction, these kids are in fact from Hunza, Pakistan. I am in touch with them and have sent them all the musical instruments they need. https://t.co/KBxzEIFBvV
— Shehzad Roy (@ShehzadRoy) August 27, 2021
काही युजर्सनी व्हिडीओमधल्या लहान मुलांच्या कपड्यांवरून आणि हातातील डब्ब्यांवरून अंदाज बांधण्यास सुरूवात केली. काही युजर्सनी मुलांच्या हातातील डब्बे हे पाकिस्तान ब्रॅंडचे नाहीत, असं सांगत हा व्हिडीओ भारतातला असल्याचं सांगितलं. तर काही युजर्सनी मुलांच्या अंगावरील कपडे पाहून हा व्हिडीओ पाकिस्तानचा असल्याचं सांगितलं. तर काही युजर्सनी हा व्हिडीओ कोणत्या देशातील आहे यापेक्षा जास्त त्यांच्या कलेला दाद देण्याचा प्रयत्न केलाय.
पण जेव्हा या व्हिडीओची चौकशी झाली तेव्हा सत्य काही वेगळंच निघालं. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओचं फॅक्ट चेक केल्यानंतर असं आढळून आलं की हा व्हिडीओ भारताचा नाही. हा व्हिडीओ पाकिस्तानमधलाच आहे. पाकिस्तानच्या हुंझा गावातील लहान मुलांचा हा व्हिडीओ व्हायरल होतोय. एव्हढंच नाही तर हा व्हिडीओ आताचा नाही तर 2014 चा आहे. भारतातील लोक हा व्हिडीओ शेअर करत लिहित आहेत की, ‘मुलांनो, तुम्हाला हिंदुस्थानची झलक दाखवतो’. पण सत्य हे आहे की यातील सूर एका पाकिस्तानी चित्रपटातील गाण्याचा आहे. त्याचे गीते आहेत ‘आओ बच्चों सैर कराएं तुमको पाकिस्तान की…’.
अनुपम खेर यांनी लगेच आपली चूक कबूल केली आणि लिहिलं, “प्रिय शहजाद रॉय, मी माझ्या मित्राकडून यात दुरुस्ती केलेली आहे. मला व्हिडीओ आवडला. या मुलांसाठी असंच महान कार्य करत रहा, खूप सारं प्रेम आणि प्रार्थना’.”