गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (१८ नोव्हेंबर रोजी) पार पडला. अर्जेंटिना ४-२ने फ्रान्सला नमवत तब्बल ३६ वर्षांचं विश्व चषक जिंकण्याचं स्वप्न पूर्ण केलं. कालपासून सोशल मीडियावर फक्त फिफा विश्व चषकाची क्रेझ पाहायला मिळत आहे. अर्जेंटिना जगज्जेता बनवल्यानंतर मेस्सीच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही.
“RRR हा चित्रपट म्हणजे…” रत्ना पाठक यांचं राजामौलींच्या चित्रपटाबाबत केलेलं विधान चर्चेत
संपूर्ण अंतिम सामन्यात सर्वाधिक चर्चेत राहिलेला खेळाडू म्हणजे स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी होय. मेस्सीने संघासाठी पाहिलेलं विश्व चषक जिंकण्याचं स्वप्न अखेर त्याने पूर्ण केलं. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मेस्सीचा एक चाहता वेगळ्या पद्धतीने त्याच्या लाडक्या खेळाडूला अभिनंदन करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तो अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचे पोर्ट्रेट काढताना दिसत आहे. हा व्हिडिओ अभिनेते अनुपम खेर यांनी ट्वीट केलाय. पण त्यांच्या कॅप्शनने लक्ष वेधून घेतलं आहे.
Video: अक्षय कुमार की ट्विंकल खन्ना, नक्की कोणासारखी दिसते लेक नितारा? व्हिडीओ होतोय व्हायरल
अभिनेते अनुपम खेर यांनी फिफा विश्वचषक विजेते संघ अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीबद्दल एक व्हिडीओ शेअर करत प्रतिक्रिया दिली. अभिनेत्याने ट्विटरवर व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये मेस्सीचा एक ‘जबरा फॅन’ दिसत आहे. तो चाहता अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू आपल्या केसांवर लिओनेल मेस्सीचा पोट्रेट बनवून घेतोय. व्हिडीओ शेअर करत अनुपम खेर म्हणाले, “माझे केस असते, तर मी शपथ घेऊन सांगतो की कालची मॅच पाहिल्यानंतर मी ही हेअरस्टाईल केली असती. जय हो मेस्सी बाबा. काहीही होऊ शकतं,” असं म्हणत आपल्या डोक्यावर केस असते तर त्या चाहत्याप्रमाणेच आपणही मेस्सीचं पोट्रेट केसांवर बनवून घेतलं असतं, असं अनुपम खेर यांनी म्हटलंय.
दरम्यान, हा व्हिडिओ डोमिनिकन रिपब्लिकची राजधानी सॅंटो डोमिंगो येथील आहे. व्हेनेझुएलाचा रहिवासी अँटोन बार्बरने प्रसिद्ध व्यक्तींचे ‘हेअर टॅटू’ बनवून जगात नाव कमावलं आहे.