‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भूमिका साकारल्यानंतर आता ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आगामी चित्रपटासाठी सज्ज झाले आहेत. ‘वन डे’ असं या चित्रपटाचं नाव असून त्याचा पहिला पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
‘प्रत्येक गुन्ह्यात एक कथा असते,’ अशी या चित्रपटाची टॅगलाइन आहे. या पोस्टरमध्ये अनुपम खेर वकीलाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. अशोक नंदा यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून केतन पटेल यांची निर्मिती आहे. ‘नौकरी से रिटायर हुआ हूँ, जिंदगी से नहीं,’ अशी ओळ या पोस्टरवर आहे. चित्रपटाच्या कथेबाबत अद्याप कोणती माहिती समोर आली नसून पोस्टर आणि टॅगलाइन पाहता हा एक थरारपट असल्याचं लक्षात येतं. अनुपम खेर यांच्यासोबत अभिनेत्री इशा गुप्तासुद्धा चित्रपटात झळकणार असल्याचं समजतंय.
नौकरी से रिटायर हुआ हूँ, ज़िंदगी से नहीं… Anupam Kher… First look poster of #OneDay… Directed by Ashok Nanda… Summer 2019 release… #EveryCrimeRevealsAStory pic.twitter.com/FtcqRRcyrw
— taran adarsh (@taran_adarsh) February 28, 2019
अनुपम खेर म्हटल्यावर त्यांच्या चित्रपटांची कथा दमदार असते. त्यामुळे या पोस्टरनेही ‘वन डे’ चित्रपटाची उत्सुकता वाढवली आहे. याआधी ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’मधील त्यांनी साकारलेल्या भूमिकेची आणि लूकची भरभरून प्रशंसा झाली होती.