तब्बल १४ वर्षांच्या मेहनतीनंतर आमिरचा खानचा प्रदर्शित झालेला ‘लाल सिंग चड्ढा’ बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरला. बॉयकॉट ट्रेंडचा या चित्रपटाला चांगलाच फटका बसला. चित्रपटसृष्टीतमधील काही बड्या कलाकारांनी आमिरचा हा चित्रपट पाहून कौतुक केलं. तर काहींनी त्याचा हा चित्रपट बॉयकॉट होत आहे हे पाहून त्याला पाठिंबा दिला. बॉयकॉट या ट्रेंडबाबत बॉलिवूड कलाकार आपलं मत मांडताना दिसत आहेत. त्यातच आता अभिनेते अनुपम खेर देखील या वादावर स्पष्टच बोलले आहेत.

आणखी वाचा – राजू श्रीवास्तव शुद्धीवर आलेच नाहीत, कुटुंबातील व्यक्तीनेच सांगितलं नेमकं काय घडलं?

अनुपम खेर यांचा ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. पण त्यानंतर प्रदर्शित झालेल्या काही हिंदी चित्रपटांना मात्र बॉयकॉट ट्रेंडचा सामना करावा लागला. नुकतंच नवभारत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी याबाबत भाष्य केलं. बॉलिवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरत आहेत. पण या चित्रपटांच्या तुलनेमध्ये दाक्षिणात्य चित्रपट उत्तम कामगिरी करत आहेत. असं नेमकं का घडतं? असा प्रश्न अनुपम खेर यांना विचारण्यात आला.

यावेळी ते म्हणाले, “दाक्षिणात्य चित्रपट उत्तम कंटेन्ट प्रेक्षकांपर्यंत घेऊन येत आहेत. मात्र बॉलिवूड चित्रपट फक्त कलाकारांवरच लक्ष केंद्रित करत आहेत. आपल्याला प्रेक्षकांप्रमाणे काम करायला हवं. प्रेक्षकांना काय हवं आहे हे न पाहता जेव्हा काम करायला सुरुवात होते तेव्हा अडचणी निर्माण होतात. आपण आजवर बरेच सुपरहिट चित्रपट तयार केले आणि तुम्ही ते चित्रपट पाहिले. पण तेलुगू चित्रपटांमधून बऱ्याच गोष्टी आपण शिकल्या पाहिजे. तेलुगू, तमिळ चित्रपटांमध्ये मी काम केलं आहे. आता मी मल्याळम चित्रपटामध्ये देखील काम करणार आहे.”

आणखी वाचा – ‘लाल सिंग चड्ढा’बाबत बोलणं जितेंद्र आव्हाडांना पडलं महागात, ट्वीट करताना चूक झाली अन्…

पुढे अनुपम म्हणाले, “मी दोन चित्रपटसृष्टींमध्ये भेदभाव करत नाही. पण दाक्षिणात्य चित्रपट हे प्रेक्षकांना काय हवं आहे हे पाहूनच तयार केले जातात. ते हॉलिवूड चित्रपटांचे रिमेक करत नाहीत. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी प्रत्येक कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते आणि आपण इथे कलाकार विकत आहोत.” अनुपम यांनी स्पष्ट शब्दांमध्ये आपलं मत मांडत आमिरचा चांगलंच सुनावलं आहे.

Story img Loader