ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्यावर सोमवारी एक छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या डोळ्याच्या वरच्या पापणीवर झालेली रांजणवाडी एका छोट्या शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आली. याबाबतच्या टि्वटमध्ये ते म्हणतात, डोळ्याच्या वरच्या पापणीवरील रांजणवाडी छोट्या शस्त्रक्रियेद्वारे काढावयास जात आहे. थोडेसे सांत्वन कोणी केले तर कदाचीत दु:ख कमी होईल. बाकी तुमची मर्जी. सध्या अनुपम खेर यांचा ‘दी अनुपम खेर शो – कुछ भी हो सकता है’ हा शो टीव्हीवर सुरू आहे. अलिकडेच त्यांच्या आईच्या पायाच्या घोट्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तेव्हा देखील अनुपम खेर यांनी आपल्या टि्वटरवरून खात्यावरून चाहत्यांना सदिच्छा देण्यासाठी आवाहन केले होते.

Story img Loader