बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अनुपम खेर सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. वेगवगेळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांचं मनोरंजन करत असतात. नुकताच अनुपम खेर यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून या व्हि़डीओमुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत. अनुपम खेर यांमी जीममधील वर्कआउटचा व्हि़डीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ पाहून चाहते चांगलेच थक्क झाले आहेत.

अनुपम खेर हे वयाच्या ६६व्या वर्षीदेखील फिटनेससाठी जीममध्ये मोठी मेहनत घेताना दिसत आहेत. या व्हिडीओत शर्टलेस अनुपम खेर वर्कआउट करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये त्यांनी लिहलं, ” आत्मविश्वास हा तुमच्या मसल्स म्हणजेच स्नायूंसारखा असतो. तुम्ही जितका तो वापराल तितकाच तो मजबूत होत जातो.” अनुपन खेर यांचा हा व्हिडीओ पाहून त्यांने अनेक चाहते थक्क झाले आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)


अनुपम खेर यांच्या या व्हिडीओवर त्यांचे मित्र आणि फिल्म निर्माते राकेश रोशन यांनी कमेंट केलीय. ते म्हणाले, ” वा क्या बात, असचं सुरू राहू दे”. तर अनुपम खेर यांचा एक चाहता म्हणाला, “खूपच मस्त सर, तुम्हा कायम तरुण पिढीला प्रेरित करता.” तर अनेक चाहत्यांनी अनुपम खेर यांचा व्हिडीओ पाहून त्यांचं कौतुक केलंय.

अनुपम खेर यांच्या बॉलिवूडमधील प्रवासाला ३७ वर्ष पूर्ण झाली आहेत. अनुपम खेर लवकरच ‘हॅपी बर्थजे’ या सिनेमात झळकणार आहेत. ‘द लास्ट शो’, ‘मुंगीलाल रॉक्स’ आणि ‘द कश्मीर फाइल्स’ या सिनेमातही ते महत्वाच्या भूमिकांमध्ये झळकतील.

Story img Loader