प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य पौडवालचे निधन झाले आहे. त्याने वयाच्या ३५व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. मूत्रपिंड निकामी झाल्याने त्याचे निधन झाल्याचे कळतय. आदित्यच्या जाण्याने कलाविश्वामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. गायक आणि म्यूझिक कंपोजर शंकर महादेवनने देखील पोस्ट करत आदित्यला श्रद्धांजली वाहिली आहे.
शंकर महादेवनने इन्स्टाग्रामवर आदित्य पौडवालचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने ‘ही बातमी ऐकून धक्काच बसला. आदित्य पौडवालचे निधन झाले. तो एक उत्तम संगीतकार आणि अतिशय चांगला व्यक्ती होता. आम्ही अनेकदा एकत्र काम केले आहे. आम्हाला नेहमी तुझी आठवण येईल’ असे म्हणत श्रद्धांजली वाहिली आहे.
म्युझिक अरेंजर, निर्माता अशी आदित्यची संगीतविश्वात ओळख होती. काही दिवसांपूर्वी मूत्रपिंडाच्या समस्येमुळे आदित्यला मुंबईमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी सकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला.