‘बर्फी’ चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक अनुराग बसू टी-सिरीजकरिता दिग्दर्शन करणार असल्याची चर्चा होती.
अनुराग हा एक प्रतिभावान दिग्दर्शक आहे. दोन वर्षांपासून बसू आणि भूषण कुमार हे चित्रपटासाठी एकत्र काम करणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता भूषण कुमार यांच्या टी-सिरीज करिता अनुराग बसू चित्रपट दिग्दर्शन करणार असल्याचे निश्चित झाले आहे. निर्मात्यांनी केवळ दिग्दर्शकाचीच निवड केली असून, चित्रपटाशी निगडीत इतर कोणतीही माहिती अद्याप कळू न शकल्याचे सूत्रांनी सांगितले.
अनुराग बसू ‘जग्गा जासूस’ आणि दिवंगत गायक-अभिनेता किशोर कुमार यांच्यावर चित्रपट करत आहे. या दोन्ही चित्रपटांमध्ये रणबीर कपूरची मुख्य भूमिका आहे.

Story img Loader