अनुराग कश्यप हा असा दिग्दर्शक आहे ज्याचे नाव बॉलिवूडमधल्या चतुरस्त्र दिग्दर्शकांच्या यादीत घेतले जाते. सध्या तो त्याच्या आगामी ‘दोबारा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. यात अभिनेत्री तापसी पन्नूची ही प्रमुख भूमिका साकारत असून हा एक सायन्स फिक्शन मिस्ट्री थ्रिलर आहे. येत्या १९ ऑगस्टला हा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट म्हणजे स्पॅनिश चित्रपट ‘मिराज’चा रिमेक आहे. सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनुराग कश्यप हा ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘अग्ली’, ‘रमन राघव 2.0’ आणि ‘देव.डी’ यांसारख्या विविध चित्रपटासांठी ओळखला जातो. नुकतंच एका मुलाखतीत त्याने चित्रपटसृष्टीतील घराणेशाहीचे समर्थन करणारे वक्तव्य केले आहे. मी स्वत:ला सर्वात जास्त घराणेशाहीवर आधारित चित्रपट करणारा दिग्दर्शक मानतो, असे त्याने म्हटले आहे. तो स्वतःलाच सर्वात जास्त नेपोटिस्टिक दिग्दर्शक का मानतो? याची काही कारणंही त्याने सांगितली आहेत.

आणखी वाचा : सुपरस्टार रजनीकांत राजकारणात पुन्हा सक्रीय होणार? राज्यपालांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

‘न्यूज 18’ शी बोलताना अनुराग म्हणाला, “मी देशातील सर्वात नेपोटिस्टिक फिल्ममेकर आहे. नेपोटिझम म्हणजे काय? माझी मुलगी चित्रपटांमध्ये काम करत नाही, पण ज्याला मी ओळखत नाही अशा व्यक्तीला मी कामावर घेत नाही. पण याला पक्षपातही म्हणता येणार नाही. मला माझ्या लोकांना ओळखण्याची गरज आहे, कारण माझा त्यांच्यावर विश्वास आहे.”

अनुरागने पुढे म्हटले, “मी खूप विश्वासाने काम करतो म्हणून जेव्हा मी एखाद्यावर विश्वास ठेवतो तेव्हा तो पूर्णपणे त्या नात्यात असणे आवश्यक आहे. मी ज्या लोकांबरोबर काम करतो त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास असतो. तुमच्या अडचणीच्या काळात तुम्ही कोणावर सर्वात जास्त विश्वास ठेवता? तर याचं उत्तर असेल कुटुंब. त्यामुळे माझ्यासाठी माझा सेट माझ्या कुटुंबासारखा आहे आणि कुटुंबातील सदस्यांवर विश्वास असणं हे माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे.

हेही वाचा : “‘दोबारा’ बॉयकॉट करा…” तापसी पन्नू आणि अनुराग कश्यपचे प्रेक्षकांना विचित्र आवाहन

“जर माझा पहिला सहाय्यक दिग्दर्शक चित्रपट दिग्दर्शक बनण्यासाठी काम सोडत असेल आणि सिनेसृष्टीतील चांगल्या सहाय्यक दिग्दर्शकाबद्दल मला माहिती नसेल, तर मग तो जाण्यापूर्वी मला एक नवा सहाय्यक दिग्दर्शक शोधून देईल. मग तुम्ही याला घराणेशाही म्हणाल का?” असा सवालही त्याने उपस्थित केला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anurag kashyap agreed he is the most nepotistic filmmaker rnv