कलाविश्वातील मंडळींचं खाजगी आयुष्य काही कोणापासून लपून राहिलेलं नाही. या मंडळींनी त्यांचं रिलेशनशिप, घटस्फोट सारं काही लपवण्याचा प्रयत्न केला तरी त्याची चर्चा ही रंगतेच. पण या चर्चांना उत्तर द्यायचं की नाही हे मात्र या मंडळींच्या हाती असतं. काही जणं आपल्या रिलेशनशिपबाबत खुलेपणाने बोलतात तर काहीजणं जगापासून आपलं नातं लपवण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याचदा आपल्या खाजगी आयुष्याबाबत चर्चा होत असेल तर याकडे ते पाठही फिरवतात. मात्र सुप्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप याला अपवाद आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनुरागचं खाजगी आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं आहे. अभिनेत्री कल्की कोचलिनबरोबर त्याने लग्न केलं आणि लगेचच त्यांचा घटस्फोट झाला. मात्र अनुरागची मुलगी आलिया कश्यप त्याच्या एक्स पत्नीबरोबर चांगलीच रमली आहे. या दोघींमधलं नातं देखील अधिक उत्तम आहे. आलिया नुकतीच कल्कीला भेटायला गेली होती. या भेटीदरम्यानचे काही फोटो आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

आणखी वाचा – भर गर्दीत दिल्ली एअरपोर्टवर सामानासह पळताना दिसली आलिया भट्ट, नेमकं घडलं काय?

सावत्र आईबरोबर तिचं बॉण्डींग पाहून अनेकांनी तिच्या पोस्टला चांगल्या कमेंट्स केल्या आहेत. इतकंच नव्हे तर कल्कीची मुलगी सप्पोबरोबर देखील आलियाने एकत्रित वेळ घालवला. सप्पोबरोबर ती स्विमिंगपुलमध्ये एण्जॉय करताना दिसली. आलियाने हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताच काही तासांमध्येच तिच्या या पोस्टला हजारो लाईक्स मिळाले आहेत.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री लावणीवर ठेका धरते तेव्हा…; हा खास व्हिडीओ एकदा पाहाच

अनुरागची ही लाडकी लेक सोशल मीडियावर मात्र फारच प्रसिद्ध आहे. हॉट अन् बोल्ड लुकमधील फोटो ती सतत सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. अनुराग आणि कल्कीने २०११मध्ये लग्नगाठ बांधली. मात्र दोन वर्षांमध्येच या दोघांच्या नात्यामध्ये फुट पडली. आणि त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. अनुरागचं हे दुसरं लग्न होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anurag kashyap daughter aaliya kashyap spend time with his ex wife kalki koechlin photos viral on social media kmd