दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘दोबारा’ हा चित्रपट चांगलाच फ्लॉप ठरला आहे. मध्यंतरी एका मुलाखतीत त्या दोघांनी मस्करीमध्ये “आम्हालाही बॉयकॉट करा” असं वक्तव्य केल्याने ते चांगले ट्रोल झाले होते. प्रेक्षकांनी त्यांच्याच विनंतीला मान देऊन त्यांच्या चित्रपटाला फ्लॉप ठरवलं आहे अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर दिसत आहे. हा चित्रपट एका स्पॅनिश चित्रपटाचा रिमेक असून बऱ्याच वर्षांनी अनुराग पुन्हा दिग्दर्शकाच्या भूमिकेत आपल्याला दिसला आहे. अनुराग कश्यपला खरी ओळख मिळवून दिली ती ‘गॅंग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटाने. हे खुद्द अनुरागनेदेखील बऱ्याच मुलाखतीत कबूल केलं आहे. पण तो चित्रपट एवढा सुपरहीट होऊनसुद्धा ‘गॅंग्स ओफ वासेपूर’मुळे कोणालाच आर्थिक फायदा झाला नसल्याचंही अनुरागने स्पष्ट केलं आहे.

युट्यूबर तन्मय भट याच्याशी बोलताना अनुराग म्हणाला “चित्रपटाच्या प्रदर्शकांसाठी म्हणजेच (viacom 18)साठी अजूनही हा चित्रपट नुकसान करून देणाराच आहे. मी हा चित्रपट करताना प्रचंड मेहनत घेतली पण त्यांच्यालेखी त्याला काहीच किंमत नाही. चित्रपटाने किती कमाई केली हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहेच, तरी प्रदर्शकांच्या मते या चित्रपटातून म्हणावा तसा नफा झालेला नाही. viacom 18 यांनी हा चित्रपट कलर्सला विकला, कलर्सने त्यातून पैसे कमावले, कलर्स ही viacom 18 यांचीच कंपनी आहे. याला इनसायडर ट्रेडिंग म्हणतात.”

delivery boy
“डिलिव्हरी बॉयचा संघर्ष कधीच कुणाला दिसत नाही!” VIDEO होतोय व्हायरल; नेटकरी म्हणाले ” डिलिव्हरी बॉयचा आदर करा”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Emotional message for father
“डोळ्यातले अश्रु डोळ्यांतच जिरवण्याची ताकद फक्त ‘बापाकडे’ असते” तरुणाची पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
Vikrant Massey Family Live in Godown
“घरातून बाहेर काढलं, वर्षभर गोदामात राहिलो…”; बॉलीवूड अभिनेत्याने सांगितल्या कठीण काळातील आठवणी
Raosaheb Danave kick viral Video
Raosaheb Danve Viral Video: रावसाहेब दानवेंची लाथ बसलेल्या कार्यकर्त्याची प्रतिक्रिया समोर; म्हणाला, “म्हणून साहेबांनी मला…”
ajay devgan and aamir khan
‘इश्क’च्या शूटिंगवेळी चिपांझीने केलेला हल्ला; ‘वाचवा, वाचवा’ म्हणत आमिर खान ओरडला अन् अजय देवगणने धावत्या कारमधून…
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका

पुढे अनुराग म्हणतो की “या चित्रपटात काम करणाऱ्या कोणत्याही कलाकाराला म्हणावे तसे मानधन किंवा नफा मिळालेला नाही. रीचाला २ लाख रुपये मिळाले, हुमा कुरेशीला ७५ हजार मिळाले, कोणाला ५० हजार मिळाले. कमीत कमीत बजेटमध्ये बनलेल्या चित्रपटावर जेव्हा तुम्ही बरेच पैसे कमावता तेव्हा त्यातला काही भाग इतर कलाकारांनाही द्यायला हवा.”

जेव्हा ‘गॅंग्स ऑफ वासेपूर’ला ७ वर्षं पूर्ण झाली तेव्हासुद्धा २०१९ मध्ये अनुरागने असंच एक विचित्र ट्विट केलं होतं. या ट्विट मध्ये तो म्हणतो, “७ वर्षांपूर्वी याच दिवशी माझ्या आयुष्यात साडे साती सुरू झाली. तेव्हापासून सगळ्यांना माझ्याकडून सतत अशाच प्रकारचं काम अपेक्षित आहे. लोकांच्या या अपेक्षांपासून अलिप्त राहायचा मी प्रयत्न करतोय. आशा करतो ही साडे साती या वर्षाअखेरीपर्यंत संपेल.

अनुरागचे बॉम्बे वेल्वेट, अगली, मुक्काबाज, रमण राघव २.० अशा कित्येक चित्रपटांना प्रेक्षकांनी म्हणावा तसा प्रतिसाद दिला नाही. ‘गॅंग्स ऑफ वासेपूर’नंतर अनुरागकडून प्रेक्षकांना वेगळं काहीच बघायचं नाहीये. ‘गॅंग्स ऑफ वासेपूर’ने भारतीय सिनेसृष्टीची गणितं बदलली. आजही त्यातली पात्रं, संवाद, त्यावर व्हायरल होणारे जोक प्रचंड लोकप्रिय आहेत. मनोज वाजपेयी, नवाझूद्दीन सिद्दीकी, पंकज त्रिपाठी, पीयूष मिश्रा, जयदीप अहलावत अशा नावाजलेल्या कलाकारांनी या चित्रपटात उत्तम काम केले आहे.

आणखीन वाचा : “आपल्या देशात आता…” बॉलिवूड चित्रपटांना होणाऱ्या विरोधाबाबत अनुराग कश्यपचं मोठं वक्तव्य