बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता आण दिग्दर्शक अनुराग कश्यप सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘दोबारा’मुळे चर्चेत आहे. सध्या तो या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहे. मागच्या काही दिवसांपासून अनुराग कश्यप त्याच्या वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. पण याशिवाय आता तो आणखी एका कारणाने चर्चेत आला आहे. अनुरागने त्याच्या इन्स्टाग्रामवर पूर्वश्रमीच्या दोन्ही पत्नींसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होतेय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनुराग कश्यपचं दिग्दर्शन आणि अभिनेत्री तापसी पन्नूची मुख्य भूमिका असलेला ‘दोबारा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमुळे सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत असलेल्या अनुराग कश्यपने इन्स्टाग्रामवर पूर्वश्रमीच्या पत्नी आरती बजाज आणि कल्कि केकला यांच्यासह शेअर केलेला फोटो देखील चर्चेचा विषय ठरतोय. या फोटोला त्याने हटके कॅप्शनही दिलं आहे.
आणखी वाचा- ‘द डर्टी पिक्चर’चा सीक्वेल येणार! विद्या बालनच्या जागी ‘या’ अभिनेत्रींच्या नावांची चर्चा

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये अनुराग कश्यप आनंदात आरती बजाज आणि कल्कि केकला यांच्यासह पोज देताना दिसत आहे. सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आहे. या फोटोच्या कॅप्शन देताना अनुरागने लिहिलं, “या दोघीही माझ्या आयुष्याच्या आधारस्तंभ आहेत.” अनुरागने १९९७ साली आरती बजाजशी लग्न केलं होतं. २००९ मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला असून या दोघांनी एक मुलगी आहे. तर कल्कि केकलाशी त्याने २०११ साली लग्न केलं होतं आणि २०१५ साली दोघांनी घटस्फोट घेतला होता.

आणखी वाचा- “पनीरवर GST दिल्यानंतर लोक चित्रपट पाहण्यासाठी पैसा…” अनुराग कश्यपचं विधान चर्चेत

अनुरागने शेअर केलेल्या या फोटोनवर त्याची मुलगी आणि मित्रमैत्रिणींनी कमेंट्स केल्या आहेत. वडीलांच्या फोटोवर कमेंट करताना आलिया कश्यपने ‘आयकॉनिक’ असं लिहिलं आहे. तर अभिनेत्री अमृता सुभाषने हार्ट इमोजी पोस्ट केलाय. अभिनेत्री कुब्रा सैतने या फोटोवर कमेंट करताना ‘बेस्ट’ असं लिहिलं आहे. दरम्यान अनुरागच्या चित्रपटाबाबत बोलायचं तर हा चित्रपट १९ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.