दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू सध्या ‘दोबारा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. अनुराग, तापसी या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताहेत. विशेष म्हणजे दिग्दर्शक-अभिनेत्रीची ही जोडी प्रत्येक विषयावर अगदी खुलेपणाने बोलताना दिसते. अनुरागसह तापसी आपल्या बेधडक वक्तव्यामुळे चर्चेत असते. आता तर अनुरागने एका मुलाखतीमध्ये तापसीबाबत आश्चर्यकारक विधान केलं. इतकंच नव्हे तर तेव्हा तापसी देखील या मुलाखतीमध्ये सहभागी झाली होती.
आणखी वाचा – कुणी तरी येणार गं! बिपाशा बासू होणार आई, फोटो शेअर करत चाहत्यांना दिली गोड बातमी
अनुरागने तापसीबाबत केलेलं विधान आणि त्यादरम्यानचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सिद्धार्थ कनन घेत असलेल्या मुलाखतीमधला आहे. या मुलाखतीमध्ये तुम्ही देखील एक न्यूड फोटोशूट करा असं अनुराग यांना सांगण्यात येतं. यावर तापसी उत्तर देते की, “कृपा करुन हॉरर शो सुरु करु नका.”
पाहा व्हिडीओ
तापसीचं उत्तर ऐकून मुलाखत घेणारी व्यक्ती तिला म्हणते, “तू अनुराग सरांवर जळत आहेस कारण तुला माहित आहे की त्यांनी जर न्यूड फोटोशूट केलं तर त्यांचा लूक व्हायरल होईल.” यावर अनुरागने दिलेलं उत्तर खरंच थक्क करणारं होतं. अनुराग म्हणाला, “ही खरंच मला घाबरते. यामागचं कारण म्हणजे माझे स्तन हिच्यापेक्षा मोठे आहेत.”
आणखी वाचा – “चित्रपटावर बहिष्कार टाकू नका कारण…” ‘लाल सिंग चड्ढा’ला थंड प्रतिसाद मिळताच करीना कपूरचं प्रेक्षकांना आवाहन
अगदी हसत आणि गंमतीने हे वाक्य अनुराग बोलून गेला. शिवाय अनुरागने जेव्हा हे विधान केलं तेव्हा तापसी देखील हसत होती. म्हणूनच अनुराग-तापसीला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. तुम्ही हद्दच पार केली, विनोदालाही मर्यादा असते अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत. तसेच अनुरागही आता ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.