अनुराग कश्यपच्या ‘अग्ली’सह चार भारतीय चित्रपटांचा मेलबर्न चित्रपट महोत्सवात समावेश करण्यात आला आहे. ११ ऑगस्टपर्यंत चालणा-या या चित्रपट महोत्सवामध्ये दाखविण्यात येणा-या ३१० चित्रपटांत १० जागतिक प्रिमियर्सचा समावेश आहे. गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘गँग ऑफ वासेपूर’नंतर अनुराग कश्यपचा हा दुसरा चित्रपट आहे जो या महोत्सवात दाखविण्यात येणार आहे. सत्यघटनांनी प्रेरित असलेल्या या चित्रपटाला ‘कान्स चित्रपट महोत्सवा’तही प्रशंसा मिळाली होती. अनुरागच्या ‘अग्ली’ चित्रपटासह अमित कुमारच्या ‘मॉन्सून शुटआउट’ आणि पुनर्वासू नाइकच्या ‘वक्रतुंड महाकाय’ या चित्रपटांचा समावेश आहे. बॉम्बस्फोट करण्यासाठी गणेशोत्सव हा उचित असल्याचे दहशतवाद्यांना वाटते, या पार्श्वभूमीवर ‘वक्रतुंड महाकाय’ चित्रपटाचे चित्रिकरण करण्यात आले आहे. या चित्रपटाची निर्मिती अनुराग कश्यपने केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा