सिक्वल्स, रिमेक हे हॉलिवूडचे प्रयोग आता बॉलिवूडलाही माहिती झाले आहेत. पण, एकाच विषयावर दोन-तीन भागांत चित्रपट करण्याचा प्रकार बॉलिवूडमध्ये फारसा कोणी हाताळलेला नाही. ‘गॅंग्ज ऑफ वासेपूर’ दोन भागांत बनवल्यानंतर आता दिग्दर्शक अनुराग कश्यप मुंबईवर तीन भागांत चित्रपट करणार आहे. ‘बॉम्बे व्हेल्वेट’ असे या चित्रत्रयीचे नाव असून सात बेटांची मिळून बनलेली मुंबई आजच्या मेट्रोपॉलिटन रूपापर्यंत कशी पोहोचली, हा विषय त्यात रंगवण्यात आला आहे. रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांची मुख्य भूमिका असलेला ‘बॉम्बे व्हेल्वेट’ ही बॉलिवूडमधली दुसरी चित्रत्रयी ठरणार आहे.
याआधी, दीपा मेहतांनी ‘फायर’, ‘अर्थ’ आणि ‘वॉटर’ अशी त्रिसूत्री घेऊन चित्रपट बनवले होते. पण, बॉलिवूडच्या मुख्य प्रवाहातील चित्रपट अशी त्यांची ओळख होऊ शकली नाही. दीपा मेहता जन्माने भारतीय असल्या तरी त्या कॅनडात स्थायिक झाल्याने आंतरराष्ट्रीय चित्रपटकर्मी हीच त्यांची कायम ओळख राहिली. हॉलिवूडमध्ये ‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ हा चित्रपटही तीन भागात बनवण्यात आला होता. सलग नऊ तासांच्या या चित्रपटाला हॉलिवूडमध्ये मोठय़ा प्रमाणावर यश मिळाले. मात्र, तरीही असे प्रयत्न फार कमी आहेत. कारण एकाचवेळी सलग एवढे चित्रिकरण करायचे आणि ते जर यशस्वी ठरले नाही तर फार मोठा आर्थिक फटका बसू शकतो. शिवाय, अशा चित्रपटांसाठी लागणारे आर्थिक भांडवल, तंत्रज्ञान या सगळ्या गोष्टी जमवून आणणेही कठीण बाब असते. याच गोष्टीमुळे अनुरागने ‘गॅंग्ज ऑफ वासेपूर’ दोन भागांत तयार केला होता. पण, पहिल्यांदा एकच भाग प्रदर्शित केला. त्याला यश मिळाल्यानंतर मग दुसरा भाग प्रदर्शित करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा