व्हिजे व प्रसिद्ध अभिनेत्री अनुषा दांडेकर तिच्या व्यावसायिक आणि खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर अनुषाचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. अनुषा सोशल मीडियावर तिच्या नव्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत आली आहे. अनुषानं तिच्या इन्स्टाग्रामवर एका लहान मुलीसोबतचे फोटो शेअर केले होती. ज्यानंतर तिनं मुलीला दत्तक घेतल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. यावर आता अनुषानं स्पष्टीकरण देत ती तिची खरी मुलगी नसल्याचं म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनुषानं तिच्या इन्स्टाग्रामवर एका छोट्या मुलीसोबतचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, “अखेर आता माझ्याकडे एक लहान मुलगी आहे. जी माझी आहे असं मी म्हणू शकते. माझ्या या परीचं नाव ‘सहारा’ आहे. माझं प्रेम. मी तुझी नेहमीच काळजी घेईन. नेहमीच तुझी रक्षा करेन. खूप सारं प्रेम माझ्या मुली. तुझी आई.” अभिनेत्री ही पोस्ट पाहिल्यानंतर तिनं मुलीला दत्तक घेतल्याचा अंदाज लावला जात आहे.

सोशल मीडियावर अनुषानं मुलीला दत्तक घेतल्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर ‘ही माझी खरी मुलगी नाही’ असं म्हणत अनुषानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिलं, “सर्वांनी खूप भरूभरून प्रेम दिलं. हे खूपच प्रेमळ आणि गोड आहे. पण ती माझी खरी मुलगी नाही तर माझी गॉड डॉटर आहे. जी माझी आहे असं मी म्हणू शकते.”

याशिवाय अनुषानं तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरीवर आणखी एक पोस्ट शेअर करत त्या चिमुकलीच्या खऱ्या आईविषयी सांगितलं आहे. अनुषानं लिहिलं, “चिमुकलीची खरी आई झोआ आणि आजी संगीता. मी तिची गॉडमदर आहे. म्हणजेच जेव्हा माझी मैत्रीण झोआनंतर सहाराला जेव्हा माझी गरज असेल तेव्हा मी कायम तिच्यासोबत असेन. त्यामुळे ती मला माझ्या मुलीसारखी आहे. पण ती माझी खरी मुलगी नाही.”

दरम्यान अनुषानं अद्याप लग्न केलेलं नाही. ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ती अनेकादा तिचे फोटो आणि फिटनेस व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. अनुषा दांडेकर एक उत्तम होस्ट, गायिका आणि वीजे देखील आहे. एवढंच नाही तर ती एक बिझनेस वूमनही आहे. तिने अलिकडेच तिचं ब्यूटी प्रॉडक्ट लॉन्च केलं आहे. ज्याचं प्रमोशन ती अनेकदा तिच्या इन्स्टाग्रामवरून करताना दिसते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anusha dandekar clarify that baby girl in her instagram post is not her real daughter or adopted mrj