व्हिजे व प्रसिद्ध अभिनेत्री अनुषा दांडेकर तिच्या व्यावसायिक आणि खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर अनुषाचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. अनुषा दांडेकर आणि अभिनेता करण कुंद्रा यांचं अफेअर एकेकाळी फार गाजलं होतं. पण दोघंही काही कारणानं एकमेकांपासून वेगळे झाले. त्यावेळी या दोघांच्या नावाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती. आता पुन्हा एकदा अनुषा सोशल मीडियावर तिच्या नव्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत आली आहे.
अनुषानं तिच्या इन्स्टाग्रामवर एका छोट्या मुलीसोबतचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, “अखेर आता माझ्याकडे एक लहान मुलगी आहे. जी माझी आहे असं मी म्हणू शकते. माझ्या या परीचं नाव ‘सहारा’ आहे. माझं प्रेम. मी तुझी नेहमीच काळजी घेईन. नेहमीच तुझी रक्षा करेन. खूप सारं प्रेम माझ्या मुली. तुझी आई.” अभिनेत्री ही पोस्ट पाहिल्यानंतर तिनं मुलीला दत्तक घेतल्याचा अंदाज लावला जात आहे.
आणखी वाचा- “वेदना होत असूनही काम करत राहिलो कारण…” अशोक सराफांची तळमळ बघून येईल डोळ्यात पाणी
अनुषा दांडेकरची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली आहे. तिच्या या पोस्टवर अनेक युजर्ससह बॉलिवूड इंडस्ट्रीतील कलाकारांनी देखील कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री करिश्मा तन्नानं कमेंट करताना लिहिलं, ‘तुला खूप शुभेच्छा’ तर एका युजरनं लिहिलं, ‘खूपच गोड, छोट्या राजकुमारीला खूप सारं प्रेम आणि आशीर्वाद.’ या फोटोमध्ये अनुषा आणि तिची मुलगी यांच्यातील खास बॉन्डिंग दिसून येत आहे.
आणखी वाचा- ‘केके’ला करायचा नव्हता त्या रात्रीचा शो? गर्दी पाहून झाला होता अस्वस्थ, गायिकेचा धक्कादायक खुलासा
दरम्यान अनुषानं अद्याप लग्न केलेलं नाही. ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ती अनेकादा तिचे फोटो आणि फिटनेस व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. अनुषा दांडेकर एक उत्तम होस्ट, गायिका आणि वीजे देखील आहे. एवढंच नाही तर ती एक बिझनेस वूमनही आहे. तिने अलिकडेच तिचं ब्यूटी प्रॉडक्ट लॉन्च केलं आहे. ज्याचं प्रमोशन ती अनेकदा तिच्या इन्स्टाग्रामवरून करताना दिसते.