बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही तिची मुलगी वामिकाचा भारतीय संघ आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामना पाहायला पोहोचली होती. अनुष्का आणि वामिकाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. ही पहिलीच वेळ होती जेव्हा वामिका तिच्या आईच्या कढेवर दिसली. स्टेडियमच्या स्टॅंडवर वामिका तिच्या आईच्या कढेवर असून वडील विराट कोहलीचा खेळ पाहत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये अनुष्का काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. तर वामिकाने गुलाही रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या आधी विराट आणि अनुष्काने कधीच त्यांच्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले पण कधीच त्यांनी तिचा चेहरा दाखवला नाही. खरतर पहिल्यांदाच सोशल मीडियावर वामिकाचा चेहरा दिसत असल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. हे फोटो नेटकऱ्यांनी सामना सुरु असताना स्क्रिनशॉर्ट म्हणून काढलेले फोटो आहेत. तर दुसरीकडे अनुष्का आणि विराटच्या चाहत्यांनी नेटकऱ्यांना वामिकाचे फोटो सोशल मीडियावरून डीलीट करायला सांगितले आहे.
विराट कोहली आणि अनुष्का नेहमीच आपली मुलगी वामिकाला प्रसारमाध्यमांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा त्यांनी फोटो काढू नये तसंच प्रसिद्ध करु नयेत यासाठी विनंतीही केली आहे. मात्र दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या निमित्ताने पहिल्यांदाचा वामिका समोर आली आहे. जोपर्यंत आपल्या मुलीला सोशल मीडियाबद्दल कळत नाही तोपर्यंत तिला त्यापासून दूर ठेवण्याचा निर्णय विराट आणि अनुष्काने घेतला आहे. त्यामुळेच ते नेहमी तिचे फोटो, व्हिडीओ प्रसिद्ध न करण्याची विनंती करत असतात.
आणखी वाचा : Video : ‘पुष्पा’तील सामी सामी गाण्यावर डेव्हिड वॉर्नरच्या मुलींनी केला भन्नाट डान्स
आणखी वाचा : “माझ्या भावांनी हिंदूशी लग्न केले”, मानहानीच्या दाव्यावर सलमानच्या वकीलांनी दिली उत्तर
विराट कोहली आणि अनुष्काची मुलगी वामिका जानेवारीत एक वर्षाची झाली आहे. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरोधात कसोटी सामना खेळत असतानाच वामिकाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याशिवाय विराट कोहली जेव्हा केपटाऊनध्ये कसोटी सामना खेळत होता तेव्हा मैदानातूनच मुलगी वामिकाला हात दाखवत होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.