‘पीके’या आपल्या आगामी चित्रपटातील सह-अभिनेता आमीर खानबरोबर अनुष्का शर्माने चित्रपटाच्या प्रसिद्धीचा भाग म्हणून निर्माण करण्यात आलेल्या ‘पीके’गेमचे शुक्रवारी मुंबईत अनावरण केले. भारताचा धडाडीचा क्रिकेटपटू विराट कोहलीने भर मैदानातून अनुष्काला रोमान्टिक फ्लाईंग किस दिल्यापासून त्यांच्यातील जवळीक आता लपून राहिलेली नाही. त्यामुळे या कार्यक्रमात विराट आणि तिच्यातील रोमान्सबाबत अनुष्कावर प्रश्नांचा भडीमार होणार हे ओघाने आलेच. परंतु, अनुष्काने या सर्व प्रश्नांना सफाईदारपणे बगल देत उत्तर देण्याचे टाळले. ‘पीके’गेम पाहून उत्साहित झालेल्या अनुष्काने या गेममध्ये गुणांच्या आधारावर चित्रपटातील मुख्य अभिनेता आमीर खानवर विजय मिळवला. आमीरवर विजय मिळवलेली अनुष्का कमालीची खूष होती. गेममधील तिचे पात्र कसे दिसेल, या बाबत अनुष्काच्या मनात शंका होती. परंतु, गेममधील अनुष्का खूपशी तिच्यासारखीच दिसत असल्याचे पाहून तिने आनंद व्यक्त केला. आपल्या चित्रपट कारकीर्दीविषयी बोलताना अनुष्का म्हणाली की मला चांगले काम आणि चित्रपट करायचे आहेत. माझ्यासाठी हे खूप महत्वाचे असून, तेव्हाच मला यशस्वी झाल्यासारखे वाटेल. चित्रपटसृष्टीतील स्पर्धेवर विश्वास नसल्याची भावना तिने व्यक्त केली. १९ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटात अनुष्का वार्ताहराची भूमिका साकारत आहे.
विराटबाबतच्या प्रश्नांना उत्तर देण्यास अनुष्काची टाळाटाळ
'पीके'या आपल्या आगामी चित्रपटातील सह-अभिनेता आमीर खानबरोबर अनुष्का शर्माने चित्रपटाच्या प्रसिद्धीचा भाग म्हणून निर्माण करण्यात आलेल्या 'पीके'गेमचे शुक्रवारी मुंबईत अनावरण केले.
![विराटबाबतच्या प्रश्नांना उत्तर देण्यास अनुष्काची टाळाटाळ](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2014/12/anushka2.jpg?w=1024)
First published on: 12-12-2014 at 07:15 IST
TOPICSअनुष्का शर्माAnushka SharmaबॉलिवूडBollywoodविराट कोहलीVirat Kohliहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 2 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anushka sharma avoids questions on virat kohli