आगामी ‘पीके’ चित्रपटाची नायिका अनुष्का शर्माने आपले वचन पूर्ण केले आहे. आपणंही आमिरप्रमाणे ट्रान्झिस्टर घालू असे तिने वचन दिले होते.
फोटो गॅलरीः आमिर-अनुष्काचे ‘पीके’मधील पाच लूक्स
आमिरप्रमाणे तिने खाकी ड्रेस परिधान केला असून, गळ्यात ट्रान्झिस्टर अडकवला आहे. पहिल्यांदाच चित्रपटातील अनुष्काचा लूक अधिकृतपणे प्रदर्शित करण्यात आला आहे. तसेच, चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये अनुष्का ही आमिरसोबत पाच विविध लूकमध्ये दिसते.
चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या आमिरनेही अनुष्काचा ‘पीके’मधील लूक ट्विट केला आहे.
Ei dekha….. humaar Jaggu…. tiranjister ke saath… http://t.co/HmKnqcGOmL
— Aamir Khan (@aamir_khan) October 16, 2014
राजकुमार दिग्दर्शित ‘पीके’ या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत, संजय दत्त आणि बूमन ईराणी यांच्याही भूमिका आहेत.