अभिनेत्री अनुष्का शर्मा ही आगामी ‘दिल धडकने दो’ चित्रपटासाठी इस्तानबुलला रवाना झाली आहे. याबाबत अनुष्काने ट्विट केले आहे, “दिल धडकने दोच्या शूटींगकरिता इस्तानबुलला रवाना झाले आहे. झोपेपासून वंचित आणि सगळाच गोंधल उडाला आहे. या प्रवासादरम्यान आता मी माझी झोप पूर्ण करणार.”
‘दिल धडकने दो’ चित्रपटात रणविर सिंग, अनुष्का शर्मा, प्रियांका चोप्रा, फरहान अख्तर, अनिल कपूर आणि शेफाली शहा इत्यादींच्या भूमिका आहेत. योगायोगाने म्हणा किंवा… क्रुझ ट्रिपवर गेलेल्या पंजाबी कुटुंबियांच्या भोवती चित्रपटाची कथा फिरत राहते. रितेश सिधवानी आणि फरहान अख्तच्या ‘एक्सेल एन्टरटेन्मेंट’द्वारे निर्माण करण्यात येत असलेला हा चित्रपट पुढच्या वर्षी जूनमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader