बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली या कपलची चाहत्यांमध्ये कायमच चर्चा असते. अनुष्का आणि विराटची केमिस्ट्री चाहत्यांमा कायम आवडते. पर्सनल आयुष्यातही विराट आणि अनुष्का एकमेकांसोबत अनेकदा धमाल करत वेळ घालवताना दिसतात. तसचं अनुष्का आणि विराट सोशल मीडियावरही चांगलेच सक्रिय असतात. अनुष्का आणि विराटचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
विरुष्काचा हा व्हायरल झालेला व्हिडीओ अनुष्का शर्मानेच शेअर केलाय. यात अनुष्काने पती विराटला एक खास चॅलेंज दिल्याचं पाहायला मिळतंय. यात अनुष्काने विराटला केवळ एका बोटावर क्रिकेट बॅट बॅलन्स करण्याचं चॅलेंज दिलंय. तर अनुष्काने यात विराटला तगडी टक्कर दिलीय. दोघही केवळ एका बोटाच्या आधाराने बॅटचा तोल सावरताना दिसत आहेत. व्हिडीओच्या शेवटपर्यंत दोघांनी बॅलन्स राखत बॅट एका बोटावर धरली आहे. त्यामुळे या स्पर्धेत नेमकं कोण जिकंलं आणि कुणाची हाक झाली हे मात्र स्पष्ट झालेलं नाही. असं असलं तरी विरुष्काच्या या व्हि़डीओला चाहत्यांची मोठी पसंती मिळताना दिसतेय.
View this post on Instagram
अनुष्का शर्मा सध्या मुलगी वामिका आणि पती विराटसोबत इंग्लंडमध्ये वेळ घालवत आहे. विराट मॅचमध्ये व्यस्त आहे. तर अनुष्का इंग्लडमध्ये मुलीसोबत एन्जॉय करतेय. इंग्लंडमधील वेगवेगळे फोटो अनुष्का चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. अनुष्का सोशल मीडियावर सक्रिय असली तरी अद्याप तिने मुलीला मात्र सोशल मीडिया आणि मीडियापासून दूरच ठेवलं आहे.