अभिनेत्री अनुष्का शर्मा गेल्या चार वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर राहिली आहे. तिचा ‘झिरो’ हा शेवटचा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर तिने थोडा वेळ ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. या काळात तिच्या मुलीचा, वामिकाचा जन्म झाला. वामिकाच्या जन्मामुळे आणि करोनाच्या संकटामुळे अनुष्काचा ब्रेक लांबला गेला. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार झुलन गोस्वामी यांच्या आयुष्यावर आधारित ‘चकदा एक्सप्रेस’ या नव्या चित्रपटाच्या माध्यमातून तिने कमबॅक करायचे ठरवले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अनुष्का शर्माने आतापर्यंत बऱ्याचशा बिगबजेट चित्रपटांमध्ये केले आहे. तिने काही चित्रपटांची निर्मिती देखील केली आहे. तिने या आधी ‘संजू’ या चरित्रपटामध्ये सहायक व्यक्तिरेखा साकारली होती. चकदा एक्सप्रेसच्या निमित्ताने अनुष्का पहिल्यांदा एका चरित्रपटामध्ये मध्यवर्ती भूमिका करणार आहे. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. त्यानंतर चित्रपटाचा टीझर देखील प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटासाठी अनुष्काने क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले आहे. नुकतंच चकदा एक्सप्रेसच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अनुष्काने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत ही बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचवली.

अनुष्काने सोशल मीडियावर नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो तिच्या ‘चकदा एक्सप्रेस’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा असल्याचे फोटोच्या कॅप्शनवरुन समजत आहे. या फोटोमध्ये अनुष्काने क्रिकेटचा सराव करताना घालायचे कपडे घातलेले आहेत. एका जुन्या घरातल्या खाटेवर ती बसलेली आहे. अनुष्का तिच्या हातातल्या शूजची लेस बांधत आहे. या फोटोमध्ये तिच्यासह आणखी एक व्यक्ती त्या खोलीमध्ये आहे. अनुष्का शर्माने या फोटोला कॅप्शन देताना “तिच्या पावलांवर पाऊल ठेवत तिचा प्रवास पुन्हा जगणे” असे म्हटले आहे.

आणखी वाचा – लग्नापूर्वीच आई होण्याचं स्वप्न पाहतेय मृणाल ठाकूर, अभिनेत्रीच्या ‘त्या’ वक्तव्याची सर्वत्र चर्चा

प्रोसित रॉय या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून अनुष्का शर्माचा हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.