बॉलिवूडची ‘पीके गर्ल’ अनुष्का शर्माचा अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘एनएच १०’ चित्रपटाने चांगला वेग पकडला असून, लवकरच हा चित्रपट बॉलिवूडमध्ये नवे रेकॉर्ड प्रस्थापित करणार असल्याचे चित्र आहे. अभिनेत्री म्हणून अनुष्काने बॉलिवूडमध्ये खास जागा बनवली असून, ‘एनएच १०’ चित्रपटाद्वारे तिने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. ‘एनएच १०’ चित्रपटातील तिच्या उत्तम अभिनयाने प्रेक्षक मंत्रमुग्घ होतात. बॉक्स ऑफीसवरदेखील चित्रपटाला चांगली सुरुवात मिळाली आहे. अनुष्काने कंगना राणावत, विद्या बालन आणि राणी मुखर्जीलादेखील मागे टाकले आहे. कंगनाच्या ‘क्वीन’ने प्रदर्शनाच्या दिवशी जवळजवळ १.७५ कोटी इतकी कमाई केली होती. विद्या बालनच्या ‘कहानी’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी तीन कोटी, तर राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी’ने पहिल्याच दिवशी ३.५ कोटी इतकी कमाई केली होती. आता अनुष्का शर्माच्या ‘एनएच १०’ ने पहिल्याच दिवशी जवळजवळ ३.३५ कोटी इतकी कमाई केल्याचे समजते. अनुष्काचा हा चित्रपट किती जलद गतीने रेकॉर्ड प्रस्थापित करतो ते येणाऱ्या काळात कळून येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा