अनुराग बसूच्या ‘बॉम्बे वेल्वेट’ चित्रपटाची अधिकृत घोषणा झाल्यापासून या चित्रपटाबाबत चर्चा चालूच आहे. आता अनुष्का शर्मी यामध्ये दुहेरी भूमिका करणार असल्याची चर्चा आहे. अनुष्का ‘बॉम्बे वेल्वेट’मध्ये जॅझ गायकाची भूमिका साकारणार असून रणबीर कपूर यात स्ट्रीट फायटरची भूमिका करणार आहे. ‘रबने बना दी जोडी’, ‘बँड बाजा बारात’, ‘जब तक है जान’ आणि ‘पी.के’ यांसारख्या चित्रपटात काम करणारी अनुष्का पहिल्यांदाच दुहेरी भूमिकेत दिसणार आहे.
जुलैच्या तिस-या आठवड्यात श्रीलंकेत बॉम्बे वेल्वेटचे पहिले अनुसूचीत चित्रिकरण करण्यात आले. तरी, दुसरे अनुसूचित चित्रिकरण नोव्हेंबर महिन्यात कोलकत्यात करण्यात येणार आहे. डिसेंबरमध्ये प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती फॅन्टॉम फिल्म्स आणि फॉक्स स्टार स्टुडिओ करत आहे.

Story img Loader