अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि कर्णधार विराट कोहली यांच्या घरी जानेवारीमध्ये एक छोटी पाहुणी आली आहे. विरुष्काने त्यांच्या मुलीचं नावं वामिका ठेवलं आहे. विरुष्काने मुलीच्या जन्माची बातमी चाहत्यांना दिली असली तरी त्यांनी मुलीला मीडियापासून दूरचं ठेवलंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आई झाल्यानंतर अनुष्का पहिल्यांदा घराबाहेर गेलीय. अनुष्काने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीला नुकताच एक फोटो शेअर केलाय. सुर्योदयाच्या या फोटोमध्ये शहर आणि शहराला लागून असलेली नदी दिसतेय. यावर अनुष्काने गुड मॉर्निंग लिहलंय. हा फोटो पाहुन अनुष्का नेमकी कुठे गेलीय? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला. मात्र अनुष्का भारतातच असून अहमदाबादमधील फोटो तिने शेअर केलाय.

अहमदाबाद इथं नरेंद्र मोदी स्टेडीयमवर होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी विराट कोहली सध्या अहमदाबादमध्ये दाखल झालाय. नेहमीप्रमाणे विराटला सपोर्ट करण्यासाठी अनुष्का वामिकाला घेऊन अहमदाबादला पोहचली आहे. साबरमती नदी काठच्या एका हॉटेलमध्ये ती थांबली असून या हॉटेलच्या खिडकीतून काढलेला फोटो अनुष्काने शेअर केलाय.  याआधी देखील अनेक सामन्यांमध्ये अनुष्का विराटला सपोर्ट करताना दिसून आलीय.

(photo from anushka sharma Instagram stories)

इंग्लंडचे माजी क्रिकेटर मार्क निकोलस यांच्या ‘नॉट जस्ट क्रिकेट’ पॉडकास्टवर विराटने अनुष्काचं कौतुक केलं होतं. यात अनुष्का माझी आधारस्तंभ आहे’ असं विराट म्हणाला होता. “अनुष्काला स्वत:ला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. तिला टीकेला समोरं जावं लागलं आहे. त्यामुळेचं ती माझ्या भावना समजू शकते आणि मी तिच्या” असं विराट यावेळी म्हणाला होता.

तर विराट आणि अनुष्काने याआधी मुलीसोबतच एक सुंदर फोटो शेअर करत तिचं नाव वामिका ठेवल्याचं सांगितलं होतं. यावेळी विरुष्काला चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या होत्या.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anushka sharma shares photo from ahmadabad as she went to support virat kohali kpw