अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचा ‘सुलतान’ या चित्रपटातील नवा लूक प्रदर्शित झाला आहे. अनुष्काने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्टर शेअर केले आहे.  पोस्टरवरील छायाचित्रात अनुष्का तिच्या प्रतिस्पर्ध्याला आखाड्यात लोळवताना दिसत आहे. अनुष्का या चित्रपटात आरफा या कुस्तीपटूची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी अनुष्काला कुस्तीचा धोबीपछाड हा डाव शिकण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली होती.
आदित्य चोप्राची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन अली अब्बास झफरचे आहे. या चित्रपटात कुस्तीपटूची भूमिका साकारण्यासाठी सलमाननेही कुस्तीचे खास प्रशिक्षण घेतले होते. तसेच, त्याने मिक्स मार्शल आर्टचेही धडे घेतले. या वर्षीच्या ईद दरम्यान ‘सुलतान’ प्रदर्शित होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anushka sharma shows her prowess in akhara her look from sultan