ती बॉलिवूडमधली सुंदर अभिनेत्री आणि तो क्रिकेटमधला धडाकेबाज खेळाडू! अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्यातील जवळीक वाढल्याने गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या विषयीच्या बातम्या माध्यमातून सतत झळकत आहेत. Mid-day.com ने दिलेल्या वृत्तानुसार अलिकडेच जोधपूरमधील ‘एनएच १०’ चित्रपटाचे चित्रीकरण संपवून मुंबईत परतलेल्या अनुष्काचे विराटला भेटणे नित्याचेच झाले आहे. सध्या विराटसुद्धा मुंबईतच आहे. लवकरच अनुष्का दोन महिन्यांसाठी ‘दिल धडकने दो’ या झोया अख्तरच्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बार्सिलोनाला जाणार असल्याने, ती शक्यतितका वेळ विराटबरोबर घालवत आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर रणवीर सिंग आणि प्रियांका चोप्रादेखील काम करत आहेत. ‘आयपीएल ७’मधून विराटचा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ बाहेर पडल्यामुळे सध्या त्याच्याकडे वेळचवेळ आहे.
माध्यमातून त्यांच्या जवळीकीबाबत बातम्या प्रसिद्ध होत असताना मौन बाळगलेल्या या जोडीने आपल्यात मैत्रीपेक्षा अधिक काही असल्याचे अलिकडेच कबूल केले आहे. एप्रिल महिन्यात अनुष्काबरोबर वेळ घालविण्यासाठी विराट पार जोधपूरपर्यंत गेला होता, त्यानंतर मे महिन्यात तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पुन्हा तो जोधपूरला गेला. यावर्षी मार्च महिन्यात अनुराग कश्यपच्या ‘बॉम्बे वेलवेट’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी श्रीलंकेत असलेल्या अनुष्काला विराटने अचानक भेटून आश्चर्याचा धक्का दिला. त्याआधी फेब्रुवारी महिन्यात हे प्रेमीयुगल न्युझिलंडमधील ऑकलंड येथे हातात हात घालून फिरताना आढळून आले होते.

Story img Loader