बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. अनुष्का ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. नुकतंच अनुष्काने तिच्या व्यावसायिक आयुष्याशी संबंधित एक मोठी घोषणा केली आहे. यापुढे अनुष्का शर्मा कोणत्याही चित्रपटांची निर्मिती करणार नाही, अशी माहिती तिने तिच्या पोस्टद्वारे दिली आहे.
अनुष्का शर्माने नुकतंच तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे तिने तिच्या प्रोडक्शन हाऊसमधून माघार घेत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रोडक्शन हाऊसची जबाबदारी तिचा भाऊ कर्णेश शर्मा सांभाळणार आहे. अनुष्काने शेअर केलेली ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.
अनुष्का शर्माने पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?
मी माझा भाऊ कर्णेश शर्मासोबत क्लीन स्लेट फिल्म्स नावाची एक प्रोडक्शन कंपनी सुरु केली होती. चांगला चित्रपट दाखवणे आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करणे हाच आमचा यामागचा उद्देष्य होता. आज या प्रवासात मागे वळून पाहिलं तर आम्ही जे काम केलं आहे आणि त्यातून साध्य झालेला हेतू हे पाहून मला अभिमान वाटतो. या कामाचे सर्व श्रेय मला कर्णेशला द्यायचे आहे, त्याने हे काम अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळले.
पण आता मला अभिनयावर लक्ष केंद्रित करायचे आहे. यामुळे मी या प्रोडक्शन हाऊसमधून माघार घेत आहे. यापुढे मी फक्त एक अभिनेत्री म्हणून काम करणार आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रोडक्शन हाऊस सीएसएफची जबाबदारी माझा भाऊ कर्णेश यांच्याकडे असेल. त्याचे खूप खूप अभिनंदन.
मी एक आई असण्यासोबतच एक प्रोफेशनल अभिनेत्रीही आहे आणि तिला तिच्या अभिनयावर मनापासून प्रेम आहे. त्यामुळे या प्रोडक्शन हाऊसची जबाबदारी एका योग्य व्यक्तीच्या हातात सोपवण्याची वेळ आली आहे आणि याचा हक्काचा मालक हा कर्णेश हाच आहे. कर्णेशच आता ही जबाबदारी पार पाडणार आहे. मला खात्री आहे की भविष्यातही कर्णेशच्या नेतृत्वाखाली CSF उत्तम चित्रपट बनवत राहील. माझ्या भावाला खूप खूप शुभेच्छा, असे तिने यात म्हटलं आहे.
Video : भर मुलाखतीत चिन्मय मांडलेकरच्या एका कृतीने वेधलं लक्ष, दिग्पाल लांजेकर म्हणाले “हे पाहून…”
अनुष्का शर्मा आणि कर्णेश शर्मा दे दोघेही सख्खे भावंडे आहेत. अजय कुमार शर्मा आणि आशिमा शर्मा अशी त्यांच्या आई-वडिलांची नावे आहेत. तो व्यवसायाने दिग्दर्शक आणि निर्माता आहे. कर्णेशचा जन्म उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे झाला. तो आर्मी स्कूलमधून उत्तीर्ण झाला आहे. त्याने NH10 चित्रपटातून पदार्पण केले.
अनुष्का शर्माच्या प्रोडक्शन हाऊसचे नाव क्लीन स्लेट फिल्म्स आहे. या प्रोडक्शन हाऊसची स्थापना २०१३ साली झाली. २०१५ मध्ये या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत NH 10, फिल्लौरी, परी, पाताल लौक, बुलबुल यांसारखे अनेक चित्रपट आणि वेब सीरीजची निर्मिती करण्यात आली. सध्या या प्रोडक्शन हाऊसद्वारे आणखी एका चित्रपटाची निर्मिती सुरु आहे. ज्या चित्रपटातून इरफान खानचा मुलगा डेब्यू करणार आहे.