अनुराग कश्यपच्या आगामी ‘बॉम्बे वेल्वेट’ चित्रपटात अनुष्का शर्मा काम करणार आहे. ती या चित्रपटात एका बार डान्सरच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा होती. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटात अनुष्का ६०च्या दशकातील जॅझ सिंगरची भूमिका करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासाठी ती इंडो-ऑस्ट्रेलियन जॅझ सिंगरकडून प्रशिक्षणही घेत आहे.
या चित्रपटात अनुष्का रणबीर कपूरसोबत काम करणार आहे. या दोघांव्यतिरीक्त चित्रपटात करण जोहर पहिल्यांदा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Story img Loader